पंढरपूर – येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे (भा.पो.से.) यांनी तालुक्यातील कोर्टी येथे जुगार अड्ड्यावर कारवाई करीत ४ लाख ०६ हजार ६४० रू.चा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाई मध्ये नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत डगळे यांना ३१ मार्च रोजी मौजे कोर्टी गावातून माळेवस्तीकडे जाणारे उजनी कॅनॉलच्या बाजुस दिनेश दिगंबर चव्हाण याचे शेतातील पत्राशेड समोर काही इसम जुगार खेळत असल्याचे बातमी मिळाल्याने बातमीप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पंढरपूर यांचेकडील पोलीस पथकाने बातमीची खात्री करून त्या ठिकाणी छापा मारला.
या छापा कारवाईत इसमनामे दिनेश दिगंबर चव्हाण ( वय ३१ वर्षे ), रियाज जावेद सय्यद ( वय ३५ वर्षे ), लतिफ दिलावर शेख ( वय ४९ वर्षे ), तायाप्पा कृष्णा काळे ( वय ४५ वर्षे ), उमेश मच्छींद्र काळे ( वय ४५ वर्षे ), नवनाथ अंकुश गडदे (वय ३५ वर्षे ), गोविंद विठ्ठल कोळेकर ( वय ५५ वर्षे ),बिरा पांडुरंग अनुसे ( वय ४० वर्षे) आणि हाजु यासिन शेख ( वय ६० वर्षे सर्व रा. कोर्टी, ता. पंढरपूर ) असे मिळून आले.
या छापा कारवाई मध्ये त्यांचे कब्जात ४,६४०/- रोख रक्कम, ०८ मोबाईल, ०७ मोटार सायकल व जुगाराचे साहित्य असा एकुण ४ लाख ०६ हजार ६४० रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आला. पोना/४२७ विनोद सुग्रीव शिंदे यांनी वर नमूद ०९ इसमांविरूध्द सरकारतर्फे मु.जू.अॅ.क. १२ (अ) प्रमाणे फिर्याद दिलेली आहे. सदरची कारवाई पोहेकॉ / ८५ कामतकर, पोना/४२७ शिंदे, पोकॉ/२११० हुलजंती, पोकॉ/१४२३ लोंढे यांनी पार पाडलेली आहे.


















