पंढरपूर – तालुक्यातील गुरसाळे पुलाजवळ बुधवारी पहाटे उपविभागीय पोलीसअधिकारी प्रशांत डगळे यांच्या टीमने कारवाई केली. या कारवाईमध्ये अवैध वाळू उपसा करीत असल्याचे आढळूनआल्याने पोलिसांनी जेसीबी, टिपर, ट्रॅक्टर, दुचाकी तसेच २५ ब्रास वाळू जप्त केली आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा केला जातो. मात्र याकडे महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे वाळू उपश्याला चाप लावला जात नाही. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील पुलाजवळून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जातो, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांना मिळाली. त्यानंतर बुधवारी (दि.२०)पहाटे आपले सहकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरज हेंबाडे, शिवानंद हुलजंती, निलेश रोंगेयांना बरोबर घेतले व त्या ठिकाणी कारवाई केली.
या कारवाई वेळी अवैधवाळू उपसा सुरु असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी जेसीबी, टिपर, ट्रॅक्टर सह २५ ब्रास वाळू, दुचाकी वाहन असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले असल्याचे दिसून येत आहे.
Post Views: 5