कुर्डूवाडी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा – 2026 मध्ये आदर्श पब्लिक स्कूल, कुर्डूवाडी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेच्या दहा विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावून शिष्यवृत्ती प्राप्त केली. यामध्ये भार्गवी चोपडे हिने 256 गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ ओंकार शेंडे (254), स्मर्णिका पवार (254), दुर्वा घाडगे (250), वेदिका करळे (248), सार्थक कदम (242), वैष्णवी देवकते (240), स्वरा शिंदे (236), आरोही कांबळे (234) व शिवांश क्षीरसागर (232) यांनी उत्कृष्ट गुण मिळवत शिष्यवृत्ती प्राप्त केली.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत देखील शाळेच्या दहा विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावून शिष्यवृत्ती प्राप्त केली. यामध्ये कृष्णा भोंग याने 236 गुण मिळवून आघाडी घेतली. त्यानंतर प्राज्वल नलवडे (230), प्रणिती दबडे (228), वैभवी जगताप (220), पार्थ घाडगे (214), मल्हार टिळेकर (208), समृद्धी नवले (202), प्रियानी भोसले (190), असित आखाडे (182) व सिद्धार्ण शिंदे (182) यांनीही शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले.
या सर्व विद्यार्थ्यांना पूनम बारबोले, बालिका कोरके, अनिता थोरात, सुरेखा कांबळे, धनंजय चोपडे, कांचन व्यवहारे, पंडित जाधव, गणेश ठवरे इत्यादी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे, प्रकल्प संचालिका पूजा सुरवसे,शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद, पालक व शाळा व्यवस्थापन समिती यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशामुळे आदर्श पब्लिक स्कूल, कुर्डूवाडीच्या शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Post Views: 6