Wednesday, July 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माघ यात्रेला भाविकांना पुरेशा सोई सुविधा;  गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीची सभा संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
December 31, 2025
in marathwada
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर  –  माघ एकादशी दिनांक २९जानेवारी, २०२६ रोजी असून, या यात्रेला येणा-या भाविकांना पुरेशा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आहेत. या बरोबरच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

मंदिर समितीची सभा दिनांक ३० डिसेंबर रोजी दु.१२.०० वाजता श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवास येथे औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस शकुंतला नडगिरे डॉ.दिनेशकुमार कदम, भास्करगिरी बाबा, संभाजी शिंदे, ह.भ.प.ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरूजी, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, प्र. व्यवस्थापक संदेश भोसले, लेखा अधिकारी मुकेश अनेचा, पुरातत्व विभागाचे सहा. संचालक डॉ. विलास वाहणे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे एस. विनोदकुमार, जतन – संवर्धन कामाचे ठेकेदार, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे, मंदिर समितीचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.

या सभेमध्ये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराच्या जतन व संवर्धन कामाचा आढावा घेण्यात आला. सर्व कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना पुरातत्व विभागास देण्यात आल्या. याशिवाय, श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी मातेच्या मुर्ती संवर्धनाबाबत आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सुचना भारतीय पुरातन विभागाने दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने देखील पुढील आठवड्यात जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक प्रस्तावित करण्यात आली असून, या बैठकीस स्थानिक लोकप्रतिनिधी, मंदिर समिती सदस्य, सल्लागार परिषद सदस्य, स्थानिक महाराज मंडळी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. यामध्ये पुरातत्व विभागाने दिलेल्या अहवालानुसार श्रींच्या मूर्ती संवर्धनाचा निर्णय घेण्यात येणार आहे.

याशिवाय, मंदिर समितीच्या आस्थापनेवरील कर्मचा-यांना सेवानिवृत्तीनंतर श्री विठ्ठलाची नित्यपुजा उपलब्ध करून देणे, उपदान लागू करणे, श्रीक्षेत्र आळंदी येथे जागा खरेदी करणे, भेट स्वरूपातील दाग-दागिन्यांचे मुल्यांकन करणे, जमिनी ज्वाईंटव्हेंचर ( Joint Venture ) म्हणून तीन वर्षासाठी भाडे तत्वावर देणे इत्यादी निर्णय घेऊन, टोकन दर्शन प्रणालीचा आढावा घेण्यात आला असून, त्याची दैनंदिन संख्या १२०० वरून १८००करण्यात आली. याशिवाय, सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार मिळाल्याबद्दल व पृथ्वीराज राऊत यांनी मागील चार महिने चांगल्या पध्दतीने व्यवस्थापक पदाचा कार्यभार सांभाळल्या बद्दल अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला. तसेच मंदिर समितीचे कर्मचारी अंबादास गजाकोष व श्री बसवगोपाल नीलमाणिक मठाच्या दासोहरण चक्रवर्ती अन्नदानेश्वर महाराज उर्फ आप्पाजी यांना नुकतीच देवाज्ञा झाली. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. अन्नदानेश्वर महाराज यांचेकडून दरवर्षी आषाढी यात्रेत पत्राशेड येथे मोफत अन्नदान करण्यात येते.

मंदिर जतन व संवर्धन कामास गती देऊन विहित वेळेत गुणवत्ता पूर्ण कामे करण्याच्या दृष्टीने तसेच माघ यात्रा २०२६ मध्ये भाविकांना चांगल्या सोई सुविधा देणे व दर्शनरांगेचे सुयोग्य नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना राबविण्यासाठी मंदिर समितीच्या सभेत सांगोपांग चर्चा करण्यात आली. याशिवाय, श्री विठ्ठल–रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संरक्षण व संवर्धनासाठी शासनाने मंजुरी दिली असून, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण आणि मंदिर समिती यांच्यात समन्वयाने तसेच सर्वांशी चर्चा करून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय होणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी यावेळी सांगीतले.
——————–

समितीच्या विद्युत व्यवस्थेच्या खर्चामध्ये होणार बचत
श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथील फ विंगच्या इमारतीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सीएसआर फंडातून विद्युत व्यवस्थेसाठी १२५ केव्हीचा सोलर प्लांट उभारण्यात येत आहे. त्याचा शुभारंभ देखील मंदिर समितीचे सहअध्यक्ष व सदस्यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामुळे विद्युत व्यवस्थेच्या खर्चामध्ये १ते १.५ लक्ष रुपयाची बचत होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

Post Views: 47
Previous Post

ग्राहकांना मिळणाऱ्या हक्काचा लाभ घेण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यक्षम करण्याची गरज- शशिकांत हरिदास

Next Post

टेंभुर्णी–बेंबळे रस्त्याचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

टेंभुर्णी–बेंबळे रस्त्याचे रखडलेले काम त्वरित पूर्ण करा

ताज्या बातम्या

गुरुपौर्णिमे निमित्त दत्तमंदिरात भक्तांची मोठी गर्दी

July 29, 2026

३१ जुलै रोजी सोलापूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

July 29, 2026

संत प्रभाकर महाराज मंदिरात भक्तांची गर्दी

July 29, 2026

खत पुरवठा, काळाबाजार आणि लिंकिंगच्या प्रश्नावर केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका

July 28, 2026
शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

July 28, 2026
महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

July 28, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीच्या जाहिराती अचानक रद्द; प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

July 28, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1010524

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!