
सांगोला – फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्यु.कॉलेज, सांगोला येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या कार्याचा, दूरदृष्टीचा व समाजहितासाठी केलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनकार्याची माहिती देत आदर्श नेतृत्व, लोककल्याणकारी प्रशासन आणि स्त्रीशक्तीचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमास प्राचार्य सिकंदर पाटील, अभिनंदन टाकळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
Post Views: 5