Tuesday, May 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

छाननीनंतरच्या उमेदवार यादीतून अमोल शिंदे यांचे नाव गायब; निवडणूक कार्यालयाचा अजब कारभार

तरुण भारतbyतरुण भारत
January 2, 2026
in marathwada
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अर्ज छाननी प्रक्रियेनंतर निवडणूक प्रशासनाचा अजब कारभार समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख तथा उमेदवार अमोल शिंदे यांचे नाव छाननीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीतून चक्क वगळण्यात आल्याने खळबळ उडाली.

चूक लक्षात येताच दुसरी दुरुस्त यादी प्रसिद्ध करण्यात आली. 

              प्रभाग क्रमांक ७-ड (सर्वसाधारण) येथून अमोल शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून छाननी प्रक्रियेत त्यांचा अर्ज वैध ठरला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या सद्यस्थितीतील उमेदवारांच्या यादीत त्यांच्या नावाऐवजी अन्य उमेदवाराचे नाव असल्याचे आढळून आले. त्यामुळे निवडणूक कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. हा प्रकार लक्षात येताच शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलीस बंदोबस्तही तातडीने तैनात करण्यात आला. दरम्यान, अमोल शिंदे यांच्या मदतीला काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार यांच्यासह विरोधी पक्षातील पदाधिकारीही धावून आले.

अमोल शिंदे व त्यांच्या समर्थकांनी निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक दोन विजया पांगारकर यांची भेट घेऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिला. पाहणीनंतर टायपिंग करताना अनावधानाने चूक झाल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. यामध्ये तातडीने दुरुस्ती करून अमोल शिंदे यांचे नाव समाविष्ट असलेली नवी यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

            राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया वेगात सुरू असताना, आधी एबी फॉर्म प्रकरण आणि आता उमेदवार यादीतील ही चूक यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अनावधानाने एवढी मोठी चूक होणे शक्य नसल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगू लागली आहे.

या प्रकारामुळे उलटसुलट चर्चेला उधाण 

महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाने वेळेनंतर ए-बी फॉर्म दिले. यावर सावरासावरी करण्याचा प्रकार होत आहे. तर आता उमेदवार यादीतून नाव गायब करण्याचा हा प्रकार म्हणजे प्रशासनाचा अजब कारभार सुरू आहे. अनावधानाने इतकी मोठी चूक राहत नाही शिवाय हा प्रकार इतका सहजासहजी होत नाही असे आरोप होत असून यामुळे उलट सुलट चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आणि इच्छुकांमध्ये सुरू होती.

– छाननीनंतरच्या उमेदवार यादीतून अमोल शिंदे यांचे नाव वगळल्याने खळबळ

–  शिवसेना शिंदे गटासह काँग्रेस व राष्ट्रवादीही अमोल शिंदे यांच्या पाठीशी

– टायपिंगमधील अनावधानाने चूक झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

–  दुरुस्ती करून नव्याने उमेदवार यादी प्रसिद्ध करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

– अखेर काही वेळानंतर चूक लक्षात येताच दुसरी दुरुस्त यादी प्रसिद्ध

Post Views: 229
Previous Post

मैंदर्गी ते दुधनी रस्त्याची दयनीय अवस्था, वाहन चालकातून तीव्र संताप

Next Post

अन्नछत्र मंडळाकडून भाविकांसाठी उत्कृष्ट नियोजन; अन्नदानाची वेळ वाढविली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अन्नछत्र मंडळाकडून भाविकांसाठी उत्कृष्ट नियोजन; अन्नदानाची वेळ वाढविली

ताज्या बातम्या

भोकरदनमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष

May 5, 2026

महिला क्रिकेट स्पर्धेत सोलापूरचा नंदुरबारवर १५५ धावांनी विजय

May 5, 2026

समर्थ करिअर अकॅडमी च्या वतीने नूतन पोलिसांचा सत्कार संपन्न

May 5, 2026

सोलापूरच्या डॉ नितीन तोष्णीवाल आणि डॉ नीलकंठ पोतदार यांची रौप्य पदकावर मोहर

May 5, 2026

नरसापूर नराधामला त्वरित मृत्यूदंड द्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

May 5, 2026

मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा – खा. शिंदे #public #viral #solapurnews

May 5, 2026

मोबाईल वरून करा जनगणना ; मुख्यमंत्र्यांनी केले नागरिकांना आवाहन #marathinews #public #viral

May 5, 2026

आता दिव्यांगांना ई बाइकची शक्ती

May 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0847919

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697