सोलापूर – आधार प्रतिष्ठान संस्थेने अल्पावधीतच केलेले कार्य कौतुकास्पद असून पर्यावरण क्षेत्रातील वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन स्पर्धा ही काळाची गरज ओळखून हे प्रतिष्ठान कार्य करीत आहे. असे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. अस्मिता बालगावकर यांनी केले. आधार प्रतिष्ठान आयोजित जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी निवृत्त सहायक गटविकास अधिकारी मल्हारी बनसोडे हे होते. तर दक्षिण सोलापूरचे शिक्षण विस्तार अधिकारी गुरुबाळा सनके हे उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ बालगावकर म्हणाल्या की, या प्रतिष्ठानने अंधश्रद्धा निर्मूलनासाठीही कार्य करत रहावे. अंनिस ही संस्था मदत करत राहिल.असे सांगून विजेत्यांचे अभिनंदन केले.
यावेळी मल्हारी बनसोडे म्हणाले की, आधारने प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. समविचारी लोक एकत्र येऊन समाजकार्य करणे हे दुर्मिळ होत चालले आहे. अशावेळी प्रतिष्ठानचे काम वाखाणण्याजोगे आहे.
यावेळी स्वागतपर मनोगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष शंकर नळे यांनी केले. प्रास्ताविक सचिव प्रा डॉ जवाहर मोरे यांनी केले . विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश चव्हाण व श्रीपाद नळे यांनी केले तर आभार संचालक पैगंबर तांबोळी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक कैलास चाबुकस्वार, ऋषिकेश व्हनमाने, संस्थापक राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष रजनीकांत कुरनुरकर, सहसचिव चंद्रकांत कुंभार, संचालक विजयकुमार वाघमारे, आप्पासाहेब कोळी, दिनेश कुलकर्णी, शिवराज सारोडे,पुनम हुक्केरी,रोहिणी नळे, जयश्री मराठे, ज्योती कांबळे, आशा चव्हाण व मंजुषा फुलारी आदीनी परिश्रम घेतले.
























