पंढरपूर – येथील स्टेशन मस्जिद येथे हिंदू मुस्लिम बांधवांसाठी ईदमिलन या कार्यक्रमाचे रविवारी (ता.५) आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व समाजातील व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे वफ्फ मंडळाचे समीर काझी हे उपस्थित होते. अशा प्रकारच्या सामाजिक ऐक्य जोपासून हिंदू मुस्लिम बंधुभाव वाढवणाऱ्या कार्यक्रमाचे कौतुक करून त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात माढ्याचे आमदार अभिजित पाटील, नगराध्यक्ष डॉ.प्रणिती भालके, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, राजु सर्वगोड, आरपीआयचे जितेंद्र बनसोडे, डॉ.अरुण मेनकुदळे, डॉ.बजरंग धोत्रे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी या एकतेचे दर्शन घडवून आणणाऱ्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे नियोजन ॲड.यासीन शेख, आबीद बेळगावकर , आरिफ बेळगावकर , शुकुर बागवान, मोहम्मद लिगाडे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते यामध्ये पंढरपूर येथील सर्व मुस्लिम समाज व विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य इंजीनियरिंग, शिक्षक, वकील, पत्रकार ,व्यावसायिक, व्यापारी या सर्व क्षेत्रातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सर्वांसाठी शीरखुर्मा चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रफिक शेख व राजूभाई मुलाणी यांनी केले.
यावेळी माजी नगराध्यक्ष इब्राहिम बोहरी, निसार शेख, सलीम वडगावकर, बाळू शेख, अलामीन पेशइमाम, सुनील सर्वगोड, अरुण कोळी, ह.भ.प.बाळासाहेब बडवे, डॉ.बी.पी.रोंगे आदी मान्यवर उपस्थित होते.

















