सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल धीरेंन्द्र शास्त्री यांनी केलल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोलापूर दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चले जाव चले जाव घोषणा देत खा. प्रणिती शिंदे व युवक कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम स्थळी मार्गावर आंदोलन करत निषेध करण्यात आला .*
आंदोलनाचे नेतृत्व सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सहप्रभारी शांभवी शुक्ला, पश्चिम महाराष्ट्र युवक कॉंग्रेस प्रभारी प्रथमेश आबनावे, मेघशाम धर्मावत, प्राची ताकतोडे, निखिल सुतार, पंकज पौळ यानी केले.
सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले नागपूर येथे झालेल्या धीरेंन्द्र शास्त्री यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत कार्यक्रमात वक्तव्य केले होते. आज भाजपा सरकार छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन सत्तेवर आले आणि महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी काही कारवाई केली नाही. या पूर्वी भगतहसिंग कोशारी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर, श्रीपाद छिंदम यांनी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहेत. यामध्ये भाजप सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा हरामखोरांना पाठीशी घालून छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करण्याचा प्रयत्न चालू आहे. हे कदापी युवक काँग्रेस सहन करू शकणार नाही.
या आंदोलनात धीरेंन्द्र शास्त्री यांचे निषधाचे बॅनर घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देत आंदोलनस्थळी चले जाव मुख्यमंत्री चले जाव म्हणत परिसर दणाणून सोडला.
सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अनंत म्हेत्रे, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे, मीडिया अध्यक्ष सुनील सारंगी, शशिकांत शेळके, महेंद्र शिंदे, धीरज खंदारे, सचिन पवार, यासीन शेख, आशुतोष वाले, सोपान मिसाळ, आकाश जांभळे, कृष्णा नाईक, अस्लम शेख, हणमंतु जावीर, दिनेश डोंगरे, चंद्रकांत नाईक, युवराज दोडमनी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


























