शिवजयंतीतून समाजसेवेचा जागर, संपूर्ण महाराष्ट्रासाठी धाराशिवमध्ये सामुदायिक विवाह
धाराशिव - केवळ शिवजयंती साजरी करण्यापुरते मर्यादित न राहता समाजाच्या गरजा ओळखून प्रत्यक्ष कृतीत उतरावे, या भूमिकेतून मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती...
धाराशिव - केवळ शिवजयंती साजरी करण्यापुरते मर्यादित न राहता समाजाच्या गरजा ओळखून प्रत्यक्ष कृतीत उतरावे, या भूमिकेतून मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती...
बार्शी - ग्रामीण भागातील समस्यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी समाजसेवेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांनी केले. श्री...
जालना : आपली पाल्य कु.ध्यानी प्रवेश येवले हिची फिस बाकी राहिल्यामुळे वीर गतसिंग इंग्रजी शाळेचे अध्यक्ष डिगंबर अरुण सरकटे रा....
अक्कलकोट - तालुक्यातील नागणसूर येथील एच.जी. प्रचंडे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील इंग्रजी विभाग प्रमुख बसवराज धनशेट्टी यांचे अक्कलकोट तालुका...
लासूर - येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भरदिवसा अडत व्यापाऱ्याच्या दुकानातून १३ लाख ३७ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची...
वळसंग - पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या चोरीच्या गुन्ह्याचा तपास अत्यंत तत्परतेने व प्रभावीरीत्या करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक...
सोलापूर : मागील अडीच वर्षापासून जिल्ह्यातील सर्व प्रसार माध्यमे विशेषतः महसूल बीट प्रतिनिधी यांच्याकडून जिल्हा प्रशासनाला खूप सहकार्य मिळालेले आहे. त्यामुळे मागील वर्षी आलेली पूर परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळणे शक्य झाले. जिल्ह्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न व कामांमध्ये प्रसार माध्यम प्रतिनिधी यांच्याकडून वेळोवेळी माहिती मिळत गेल्याने त्यात आवश्यक बदल करून ती कामे मार्गी लावण्या प्रशासनाला मदत झाली. त्यामुळे प्रशासन व पत्रकार यांच्यात पुढील काळात ही चांगला समन्वय असावा, असे मत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केले. नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित महसूल बीट प्रतिनिधी यांचा पत्रकार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, मराठी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक संचारचे प्रतिनिधी विक्रम खेलबुडे, दैनिक पुण्यनगरी चे महेश पांढरे, लोकमतचे बाळकृष्ण दोड्डी, सकाळचे प्रमोद बोडके, तरुण भारतचे अविनाश गायकवाड, तरुण भारत संवाद चे संतोष आचलरे, एबीपी माझाचे आफताब शेख, टीव्ही नाईन चे सागर सुरवसे त्यांच्यासह महसूल बीट चे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद हे सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत असताना म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील पत्रकारिता चांगली असून ते प्रशासनाला नेहमी सहकार्य करत असतात. मागील अडीच वर्षे जिल्हाधिकारी म्हणून कार्य करत असताना पत्रकारांनी सहकार्याची भूमिका ठेवली व पुढे ही अशीच भूमिका कायम ठेवावी असे आवाहन त्यांनी केले. तसेच मागील वर्षी माझी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्या पूर परिस्थितीमध्ये प्रशासन चांगल्या प्रकारे काम करून अनेक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे व तसेच पुरात अडकलेल्या अनेक नागरिकांना बचाव पथकामार्फत बचाव करण्यात प्रशासन यशस्वी झाले. यावेळी प्रसार माध्यमाने प्रशासनाशी सहकार्याची भूमिका ठेवल्याने प्रशासनाला अधिक गतीने काम करणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. आषाढी व कार्तिकी वारीमध्ये वारकऱ्यांना उत्कृष्ट सोयी सुविधा देण्यामध्ये प्रसारमाध्यम प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचाही स्वीकार करून त्या पद्धतीने प्रशासनाने काम केले. वारीचे नियोजन ही त्यामुळे उत्कृष्ट झाले. तसेच होटगी रोड विमानतळ येथून विमानसेवा सुरू करणे, बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवणे, आयटी पार्क जागा निवडून सुरू करणे, पंढरपूर येथील कॉरिडॉर अशा अनेक महत्त्वपूर्ण विकास कामांमध्ये प्रसार माध्यमाने प्रशासनाशी सहकार्य पूर्ण भूमिका बजावली, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले. प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व महसूल बीट प्रतिनिधी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी केले तर आभार सकाळचे प्रतिनिधी प्रमोद बोडके यांनी मानले. या कार्यक्रमास उपस्थित पत्रकार पुढील प्रमाणे :- श्री. विक्रम खेलबुडे, श्री. प्रमोद बोडके, श्री. महेश पांढरे, श्री. अविनाश गायकवाड,...
पांगरी : प्रांतिक परिषद 10 मे 1924 रोजी.डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली बार्शी जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आली होती.त्या मध्ये...
वळसंग : दि.०७ जानेवारी रोजी वळसंग पोलीस ठाणे हद्दीत पोलीस रेझिंग डे निमित्त शंकरलिंग प्रशाला, वळसंग, श्री रामलिंगेश्वर प्रशाला, तीर्थ...
मोडनिंब - येथील मोडनिंब (ता.माढा) शहरातील प्रभाग क्रमांक सहा मधील अंडरग्राऊंड ड्रेनेज योजनेच्या कामाचे भूमिपूजन आज पार पडले. या भागातील...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697