बार्शी – तालुक्यातील बावी (आ) गावात महावितरणच्या कथित दुजाभावपूर्ण वीज वितरण धोरणाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. परिसरातील इतर गावांना कृषीपंपांसाठी सुमारे आठ तास वीजपुरवठा केला जात असताना बावी गावाला केवळ दोन तास वीज दिली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या सबस्टेशनवर ठिय्या आंदोलन सुरु करत बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.
आंदोलक शेतकरी विशाल मिटे यांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. गावचे सरपंच यांनीही परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट करताना सांगितले की, गावाची पाण्याची टाकी पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी किमान साडेचार तास सलग वीज आवश्यक असते. त्यानंतर संपूर्ण गावात पाणीपुरवठा करण्यासाठी आणखी काही तास लागतात. अशा परिस्थितीत केवळ दोन तासांच्या वीजपुरवठ्यावर गावातील पाणी योजना चालविणे अशक्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.
Post Views: 22