बार्शी – सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचारी बार्शी तालुका यांच्यातर्फे भगवंत महोत्सवानिमित्त रुपये १,२५,०००/- (सव्वालाख) वर्गणी भगवंत महोत्सव समितीकडे सुपूर्द करण्यात आली.
सदर प्रसंगी मा.आमदार राजाभाऊ राऊत, समितीचे अध्यक्ष सुभाष लोढा, माजी नगराध्यक्ष असिफ तांबोळी, श्री. संतोष सूर्यवंशी व बँकेतील सर्व कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.


























