सांगोला – शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, सांगोला येथे सेइनुमेरो निर्माण प्रा.लि.पुणे या कंपनीच्या वतीने कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन संस्थेचे सचिव अंकुशराव गायकवाड यांच्या हस्ते तर प्राचार्य डॉ.रणजित देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील ५३, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील ३९, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील ३४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुलाखती व निवड प्रक्रियेसाठी कंपनीतर्फे ऋषिकेश धुमाळ, राहुल लेंडवे उपस्थित होते. या कॅम्पस ड्राइव्हच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष इंजि.महादेव गायकवाड, सचिव अंकुशराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा.संदीप बावचे, विभागीय समन्वयक प्रा.धनराज खंदारे, प्रा.ऋषिकेश गयाळी यांनी परिश्रम घेतले.