सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दक्षिण सोलापूर तालुका केंद्रस्थानी असून १४ सोसायट्यांच्या ठरावांवर हरकती घेण्यात आल्या आहेत. दरम्यान, माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी भंडारकवठे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा ठराव रद्द करण्याची मागणी सहाय्यक निबंधकांकडे केली आहे.
भंडारकवठे सोसायटीमध्ये गोपाल सोमण्णा जंगलगी यांच्या नावाचा ठराव करण्यात आला आहे. मात्र, सोसायटीत केडरमार्फत गट सचिवाची नियुक्ती झालेली नसल्याने प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया वैध नसल्याचा आक्षेप देशमुख यांनी घेतला आहे. याबाबत त्यांनी सहाय्यक निबंधकांना पत्र दिले आहे.
प्रतिनिधी नियुक्तीचा ठराव रद्द करून केडरने नियुक्त किंवा सुचविलेल्या गट सचिवामार्फत जिल्हा बँकेसाठी प्रतिनिधी नियुक्तीची प्रक्रिया राबवावी, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
दरम्यान, दक्षिण सोलापूरमधील अन्य १४ सोसायट्यांच्या ठरावांवरही गावचा रहिवासी नसणे, सभासद नसणे आणि संबंधित गावात जमीन नसणे, असे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. या हरकतींवर सुनावणी होण्याची शक्यता आहे
Post Views: 8