सोलापूर – महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना, सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच व हेरिटेज समुह, चॅम्प चेस स्कूल व नेक्स्ट मुव्ह चॅम्पियन ऑनलाइन चेस अकॅडमीच्या सहकार्याने सोलापुर चेस अकॅडमीने चॅम्पियन चषक १३ वर्षाखालील खुला व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेचे शुक्रवार ५ ते ७ जुन* दरम्यान आयोजन केलेले आहे.
येथील गांधीनगर नगरमधील हेरिटेज येथील प्रशस्त हॉलमध्ये या बुद्धिबळ स्पर्धा रंगणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंना आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त व्हावे व उदयोन्मुख खेळाडूंना चालना मिळावी या हेतुने सोलापुरात १३ वर्षाखालील गटाकरिता आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या स्विस लीग नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात स्पर्धा संपन्न होणार असुन खेळाडूंना प्रत्येकी ६० मिनिटे व प्रत्येक चालीला ३० सेकंद वाढीव वेळ देण्यात येणार आहे. या स्पर्धेत दि. १ जानेवारी २०१३ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेले खेळाडू सहभाग घेऊ शकतात. सदर स्पर्धेतुन दोन मुले व दोन मुलींची निवड राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी करण्यात येणार आहे. या निवड चाचणी *स्पर्धेतील विजेत्यांना ३६ हजार रकमेची रोख पारितोषिके व रु. २१००० ची आकर्षक चषक व पदके प्रदान करण्यात येणार आहेत.*
या स्पर्धेतुन निवड झालेल्या खेळाडूंना राज्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त होणार आहे. जिल्हा पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंची राहण्याची मोफत सोय अकॅडमी कडून केली जाणार असुन या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सोलापुर जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील बिगरमानांकित बुद्धिबळ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त करण्याची संधी मिळणारआहे. तसेच स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी काम पाहणार असल्याची माहिती संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय पंच सुमुख गायकवाड यांनी सांगितली आहे.
इच्छुक खेळाडूंनी अधिक माहितीसाठी वरिष्ठ राष्ट्रीय पंच उदय वगरे मो.क्र. ८८८८०४५३४४ यांच्याकडे संपर्क साधावा. या स्पर्धेत जिल्ह्यातील १३ वर्षाखालील जास्तीत जास्त खेळाडूंनी लाभ घ्यावा असे आवाहन सोलापुर डीस्ट्रीक्ट चेस असोसिएशनचे अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील, हेरिटेज समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज शहा, अकॅडेमीचे अध्यक्ष महेश धाराशिवकर यांनी केले आहे.
Post Views: 12