Friday, July 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जलसंपदा विभागाच्या महत्त्वकांक्षी योजनांच्या पूर्ततेसाठी मुख्य अभियंता कार्यालय सोलापुरात

तरुण भारतbyतरुण भारत
July 24, 2026
in solapur
0
जलसंपदा विभागाच्या महत्त्वकांक्षी योजनांच्या पूर्ततेसाठी मुख्य अभियंता कार्यालय सोलापुरात
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : शेवटच्या घटकातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मुबलक पाण्याची सोय व्हावी याकरिता प्रलंबित योजनांना गती देण्यासाठी तसेच जलसंपदा विभागाच्या महत्त्वकांक्षी योजनांच्या पूर्ततेसाठी कामाचे विकेंद्रीकरण करून मुख्य अभियंता कार्यालय सोलापुरात आणण्यात आले आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे – पाटील यांनी केले. महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे अंतर्गत जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद् घाटन शुक्रवारी जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या हस्ते झाले.
प्रारंभी जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या हस्ते सिंचन भवन येथे फीत कापून आणि नियोजन भवन सभागृहात दीपप्रज्वलनाने जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद् घाटन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार उत्तमराव जानकर, आमदार अभिजीत पाटील, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, मुख्य अभियंता संजीव चोपडे उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री डॉ. विखे – पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिलेल्या दुष्काळमुक्त, सिंचनयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जलसंपदा विभाग युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. सोलापुरात मुख्य अभियंता कार्यालय आल्यामुळे कामाचे विकेंद्रीकरण होणार आहे. भीमा, सीना, बोरी नदीसह इतर नद्यांवर बंधारे बांधण्यात येणार आहेत. उजनी धरणातील १५ ते २० टीएमसी गाळ काढण्यासाठी महिनाभरात निविदा प्रक्रिया होणार असून तीन महिन्यांत उजनीत गाळ काढण्याचे काम सुरू होणार आहे. हे काम पुढील एक ते दोन वर्षे युद्धपातळीवर करण्यात येणार असून त्यानंतर सोलापूरला पाण्याची टंचाई भासणार नाही. भीमा नदीवर १५ बॅरेज  बांधण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांना पाणी मिळावे याकरिता शेवटच्या टोकापासून हे बांधकाम होणार आहे. तसेच दोन्ही कालव्याचे अस्तरीकरण करून शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहचविण्यात येणार आहे. याशिवाय पुराचे ७० टीएमसी पाणी नीरा आणि उजनीत आणून सोलापूर जिल्ह्यासह धाराशिव तसेच इतर दुष्काळी जिल्ह्यांना देण्यात येणार आहे. आमदार सुभाष देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी मागणी केलेल्या उजनी, एकरुख पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी मंजुरी देण्यात येत असून सोलापूर महानगरपालिकेसोबत याबाबत सामंजस्य करार करणार असल्याचेही मंत्री श्री. विखे – पाटील यांनी सांगितले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, २८ वर्षे प्रलंबित असलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेला जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे – पाटील यांनी ४५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्यामुळे या दोन्ही तालुक्यातील जमीन मोठया प्रमाणात सिंचनाखाली आली आहे. बॅरेज, सर्व्हेक्षण, पीडीएन, कालवा देखभाल दुरुस्ती, आयटी पार्कला जलसंपदा विभागाची जागा असे अनेक प्रश्न मंत्री डॉ. विखे – पाटील यांनी सोडविल्यामुळे सोलापूरकरांच्या अपेक्षांची पूर्तता होत आहे.
आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर जिल्हा कमी पर्जन्यमानाचा असल्याने येथील सिंचन योजनांची कामे मार्गी लावण्याची मागणी मनोगतातून केली. यावेळी आमदार अभिजीत पाटील, आमदार उत्तमराव जानकर, कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
मुख्य अभियंता संजीव चोपडे यांनी प्रास्ताविक केले. ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन तर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सु.स. खांडेकर यांनी आभार प्रदर्शन केले.
———
चौकट १
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा आग्रह
जलसंपदा विभागाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालय सोलापुरात व्हावे असा आग्रह आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी धरला होता. त्यांच्या आग्रहामुळे हे कार्यालय सोलापुरात सुरू झाल्याचे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
———
चौकट २
आयटी पार्कला जागा देता आली याचे समाधान
सोलापुरातील होटगी येथे होणाऱ्या आयटी पार्कसाठी जलसंपदा विभागाकडून जागा देता आली याचे समाधान आहे. आयटी पार्कमुळे सोलापूरकरांच्या स्वप्नाची पूर्तता होत आहे, असेही जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे – पाटील याप्रसंगी म्हणाले.
Post Views: 14
Previous Post

सांगोला महाविद्यालयात लोकमान्य टिळक, अजितदादा पवार यांची जयंती साजरी

Next Post

श्री मल्लिकार्जुन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची वारकरी वेशभूषेत भव्य दिंडी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
श्री मल्लिकार्जुन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची वारकरी वेशभूषेत भव्य दिंडी

श्री मल्लिकार्जुन हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची वारकरी वेशभूषेत भव्य दिंडी

ताज्या बातम्या

आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

आमदार राऊत यांच्या वृक्षारोपण संकल्पात सुयश विद्यालयाच्या बालवारकऱ्यांचा खारीचा वाटा

July 24, 2026

बुधवारी श्री.वटवृक्ष मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव

July 24, 2026
श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर किताबाचा  मानकरी  बीड चा अर्जुन रहाडे 

July 24, 2026

उपवास’ महागला! बटाटा वेफर्स, साबुदाणा चिवड्याचे दर २४० रुपयांवर

July 24, 2026
पी. एस. इंग्लिश मिडीयमच्या प्रांगणात रंगला बाल भक्तांचा मेळा

पी. एस. इंग्लिश मिडीयमच्या प्रांगणात रंगला बाल भक्तांचा मेळा

July 24, 2026

गावकरी पाण्याच्या तर ठेकेदार निधीच्या प्रतिक्षेत 

July 24, 2026
व्हि.जी.शिवदारे प्री प्रायमरी स्कूल व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा 

व्हि.जी.शिवदारे प्री प्रायमरी स्कूल व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा सोहळा 

July 24, 2026
माऊली शिक्षण संस्थेत आषाढी वारीनिमित्त बालदिंडी सोहळा उत्साहात संपन्न

माऊली शिक्षण संस्थेत आषाढी वारीनिमित्त बालदिंडी सोहळा उत्साहात संपन्न

July 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0996313

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!