मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित , श्री मल्लिकार्जुन बालक मंदिर ,श्री सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा,श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी काढण्यात आली.
प्रशासन अधिकारी(म.न.पा.)मा.श्री मल्हारी माने, केंद्रप्रमुख मनपा मुली कॅम्प शाळा मा.सौ नदाफ मॅडम, विस्तार अधिकारी.मा.श्री जमादार साहेब, कुमठे केंद्र प्रमुख मा.श्री सिद्राम वाघमोडे, पतसंस्थेचे चेअरमन कलप्पा फुलारी,माजी मुख्याध्यापक वैजिनाथ हत्तुरे,प्र.मुख्याध्यापक मा.श्री रमेश दिंडोरे , उपक्रम प्रमुख श्री धरेप्पा हत्तुरे ,विनायक हत्तुरे , संजय पवार यांच्या शुभहस्ते श्रींच्या पालखीचे पूजन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये भगव्या पताका, टाळ,मृदुंग, ढोल आणि विठूरायाच्या जयजयकाराने हत्तुरे नगर दणाणून गेले. यावेळी मा.प्र.मुख्याध्यापक श्री रमेश दिंडोरे यांनी आपल्या मार्गदर्शनात आषाढी एकादशीचे महत्त्व सांगून विठुरायांचा भक्तिभाव सांगितला.
यावेळी प्रमुख उपस्थिती प्रा.मुख्याध्यापक सचिन जाधव, संगीता हुमनाबादकर, सुधाकर कामशेट्टी,रितेश हत्तुरे,अनिलकुमार गावडे,बसवराज कोरे,भारत राऊत, सुकेशनी गंगोडा, अनिता हौदे, दत्तात्रय अगरखेड, आनंद काकडे,गुरुसिध्दप्पा पाटील,अमरनाथ कदारे, रमेश आगवणे,संतोष स्वामी, परमेश्वर चांदोडे, आकाश खराडे,गणेश कोरे, महेश चिवरे,प्रिया पसारे, प्रतीक्षा बिडवे प्रा.लक्ष्मीकांत पनशेट्टी तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक ,शिक्षकेतर- कर्मचारी वारकरी वेशभूषेत उपस्थित होते.
Post Views: 16