सांगोला – महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण प्र.प्राचार्य डॉ.सुरेश भोसले यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या शैक्षणिक व सामाजिक तसेच स्व.अजितदादा पवार यांच्या शैक्षणिक, सामाजिक व राजकीय कार्याची माहिती दिली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्र.कार्यालयीन अधीक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली जयंती, पुण्यतिथी उपक्रम आयोजन समितीचे प्रमुख डॉ.जमीर तांबोळी, प्रशासकीय कर्मचारी बाबासो इंगोले, अवधूत कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.