Tuesday, July 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘शुभराय आर्ट गॅलरी’ प्रकल्प रखडल्याने नागरिकांत नाराजी

तरुण भारतbyतरुण भारत
May 26, 2026
in solapur
0
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवे व्यासपीठ मिळावे, कलाकारांना स्वतंत्र दालन उपलब्ध व्हावे या उद्देशाने हाती घेण्यात आलेली महत्त्वाकांक्षी ‘शुभराय आर्ट गॅलरी’ योजना गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडल्याने नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अर्धवट अवस्थेत पडून असलेल्या या प्रकल्पामुळे शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होत असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
          दरम्यान, संबंधित बांधकाम हे भुईकोट किल्ल्याच्या ३०० मीटर परिसरात येत असल्याने पुरातत्व विभागाकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. या नोटीसमुळे पुढील काम थांबविण्यात आल्याचे सांगितले जात असले, तरी गेल्या अनेक महिन्यांपासून या अडचणीवर कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
           सोलापूर महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणारा हा प्रकल्प सन २०२२-२३ मध्ये तत्कालीन आमदार प्रणिती शिंदे यांच्या आमदार निधीतून मंजूर करण्यात आला होता. यासाठी सुमारे २ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. शहरातील कला, चित्रकला, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध प्रदर्शनांसाठी स्वतंत्र जागा निर्माण करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती.महापालिकेकडून हे काम शंभवी कन्स्ट्रक्शन या ठेकेदार संस्थेला देण्यात आले. सुरुवातीला बेसमेंटचे काम पूर्ण झाले असून गाळ्यांची उभारणी व इतर कामेही करण्यात आली आहेत. मात्र, मुख्य स्लॅबचे काम अद्यापही अपूर्ण असल्याने संपूर्ण प्रकल्प अर्धवट अवस्थेतच पडून आहे.
            विशेष बाब म्हणजे, प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नसतानाही संबंधित ठेकेदाराला दोन कोटी रुपयांहून अधिक रकमेचे बिल अदा करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे “काम अपूर्ण आणि देयके पूर्ण” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सध्या शुभराय आर्ट गॅलरी परिसरात अर्धवट सिमेंट-काँक्रीटचे ढांचे उभे असून, बंद अवस्थेतील बांधकामामुळे परिसराच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे.
       शहराच्या सांस्कृतिक विकासासाठी महत्त्वाचा मानला गेलेला हा प्रकल्प आता प्रशासनाच्या दुर्लक्षाचा बळी ठरत असल्याची भावना शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे रखडलेल्या या प्रकल्पाबाबत प्रशासनाने तातडीने स्पष्ट भूमिका घेऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
Post Views: 62
Previous Post

नीरा नरसिंहपूर येथे श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांकडून नदी स्वच्छता मोहीम

Next Post

वेळापूर येथे बुधवारी शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
वेळापूर येथे बुधवारी शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा

वेळापूर येथे बुधवारी शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा

ताज्या बातम्या

वारी दरम्यान खासगी दवाखाने सुरू राहणार…… #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

राम मंदिर देणगीचे राजकारण करू नका #viral#nationalnews

July 21, 2026

*सावधान ही दृशे तुम्हाला विचलित करू शकतात* समृद्धी महामार्गावर एकाच कुटुंबातील तिघांसह सहाजण ठार

July 21, 2026

केशरी कार्डधारकानो ही बातमी वाचाच….. #viral #maharashtranews #marathinews #news

July 21, 2026

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षणमंत्र्यांना बैठक घेण्याचे निर्देश #viral #maharashtranews

July 20, 2026

महिलेने फेकली धार्मिक भावना दुखावणारी चिठ्ठी, महिलेवर गुन्हा दाखल #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी अकलूज येथे स्वागत करताना जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन

July 20, 2026

खास वारकरी वेशात जिल्हाधिकाऱ्यांनी केले भविकाना निवेदन #viral #marathinews #solapurnews

July 20, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0989781

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!