सोलापूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोलापूर शहर दयानंद नगर सेवा विभागाच्यावतीने पूर्व विभाग विणकर बगीचा, कन्ना चौक, सोलापूर येथे रविवारी दी. ०५ एप्रिल २०२६ सकाळी ७.३० ते ९ या वेळेत स्वच्छता अभियान उपक्रम उत्साहात पार पडला. या स्वच्छता अभियानात सुमारे १८० जणांचा सहभाग होता.
या उपक्रमात हरिओम संस्था, विणकर प्रभात मंडळ, संजीवनी फाऊंडेशन, विणकर वॉकिंग समूह ,भूमकर वॉकिंग समूह , योगा समूह , बरेच संस्था सुद्धा सहभागी झाल्या तसेच परिसरातील नागरिक, महिला, पुरुष व बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे प्रदीपसिंग रजपूत सोलापूर जिल्हा सरकारी वकील यांच्या हस्ते भारतमाता पूजनाने करण्यात आली. यावेळी प्रविण तळे वृक्ष आयाम सहप्रमुख, पर्यावरण संरक्षण गतीविधी व सीईओ – सृष्टी इकोव्हिजन फाउंडेशन, करपे सोलापूर जिल्हा सेवा विभाग तसेच उपस्थित होते.

















