पिलीव – ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक दर्जात्मक, प्रभावी व लोकभिमुख आरोग्य सेवा मिळाव्यात, या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र, पिलीव ता. माळशिरस येथे सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) अंतर्गत दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला. दिनांक १७/११/२०२६ ते २०/११/२०२६ या कालावधीत दोन बॅचमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, पुणे येथील प्राचार्य डॉ. सुहास कोरे तसेच प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला.
या प्रशिक्षणात CPHC प्रशिक्षक डॉ. अमेय फुले, डॉ. सुमित्रा कुरळे, डॉ. शबाना गारदी, नेत्र चिकित्सक श्री. किरण गोराडे, तसेच श्रीम. विजया चव्हाण, श्रीम. क्रांतिस्नेहल पाटील (शेवाळे), लतिका भुसारे, श्रीम. दिपाली माने आणि श्री. राजू शेख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान गरोदरपणातील, प्रस्तुती अंतर्गत व प्रस्तुती पश्चात काळजी,नवजात शिशु आणि अर्भकाच्या आरोग्यसेवा
बालक व किशोरवयीन अवस्थेतील आरोग्यसेवा
कुटुंब नियोजन व गर्भनिरोधक सेवा,राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम आणि संसर्गिक आजारांचे व्यवस्थापन,सामान्य संसर्गित व किरकोळ आजाराचे व्यवस्थापन,असंसर्गजन्य आजारांची छाननी व प्रतिबंधात्मक उपाय,डोळे व कान समस्यांची प्राथमिक काळजी,मौखिक आरोग्याची मूलभूत काळजी,
वृद्धपकाळातील आणि वेदनाशामक काळजी,
तात्कालीन वैद्यकीय सेवा,
मानसिक आरोग्य व समुपदेशन,योग व आयुष उपचार पद्धतीचा अवलंब
नेतृत्व गुण, संवाद कौशल्य, महिलांचे आरोग्य व पुरुषांचा सहभाग, यावर मार्गदर्शन करण्यात आले तसेच सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा (CPHC) अंतर्गत प्रतिबंधात्मक व उपचारात्मक सेवा अधिक बळकट करणे तसेच आरोग्य संस्थेची गुणवत्ता कशी वाढवावी, यावर विशेष भर देण्यात आला. या अद्ययावत ज्ञान व कौशल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना अधिक दर्जेदार सेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
या प्रशिक्षण वर्गासाठी पिलीव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास जाधव यांच्यासह आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, लॅब टेक्निशियन, औषध निर्माण अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, गट प्रवर्तक आणि आशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.