सोलापूर – कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे. ही माहिती महासंघाचे अतिरिक्त सरचिटणीस तथा सोलापूर जिल्हा परिषद शाखेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांनी दिली.
भारतीय संविधानातील तरतुदींनुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण तातडीने लागू करावे, २९ डिसेंबर २०१७ व ७ मे २०२१ चे शासन निर्णय रद्द करावेत, तसेच पदोन्नती व सरळसेवा भरतीमधील अनुशेष भरावा, अशा प्रमुख मागण्या आंदोलनातून करण्यात येणार आहेत.
यासोबतच शासकीय व अनुदानित संस्थांतील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि वाहनचालक, परिचर व अन्य रिक्त पदे नियमित भरतीद्वारे भरण्याची मागणीही महासंघाने केली आहे.
Views: 22