करमाळा – मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या शिवधर्म पद्धतीच्या शिवविवाहांचे आकर्षण मराठा व बहुजन समाजात दिवसेंदिवस वाढत आहे. अशाच पद्धतीचा शिवविवाह करमाळा तालुक्यातील कुंभेज फाटा येथे नुकताच संपन्न झाला.
जेऊर येथील शिवमती पुष्पा व शिवश्री बाळकृष्ण राजाराम निर्मळ रा.जेऊर ता.करमाळा यांचे द्वितीय चिरंजीव शिवमान अतुल व शिवमती अनिता व शिवश्री प्रमोद दादासाहेब भोसले रा.कुंभेज यांची ज्येष्ठ कन्या शिवकन्या हर्षदा यांचा शिवविवाह शिवधर्म पद्धतीने थाटात साजरा करण्यात आला.राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमापूजनाने शिव विवाहाची सुरुवात झाली.
यावेळी फुले-शाहू-आंबेडकरां चा वारसा पुढे चालवणाऱ्या राष्ट्रसंत जगद्गुरु तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,तथाकथ गौतम बुद्ध, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगेबाबा, संत कबीर, कर्मवीर भाऊराव पाटील, संत रोहिदास, महात्मा ज्योतिराव फुले, अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, स्वामी विवेकानंद सर्व महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन वधूवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व.ना.अजित पवार यांच्याही प्रतिमेस हार घालून त्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

























