माळशिरस – अखिल महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले शिखर शँभु महादेवाची यात्रा सुरु झाली असून या यात्रे मधील मुख्य आकर्षण असलेल्या मुंगी घाटातील कावडी सोहळा असून या यात्रे साठी माळशिरस शहर व परिसरातील कावडी आज रवाना झाल्या आहेत. शिखर शिंगणापूरच्या यात्रेसाठी माळशिरस शहरातून नारायण थोरात, ,गंगाधर सुतार,तानाजी सुतार,नामदेव कुंभार,विजय बोकफोडे .सुभाष कोळी ,गोविंद कोळी ,रखमाजी जंगले,महादेव शिंदे,शिवाजी शिंदे,प्रकाश पिसे,सोनवणे,बोराटे यांच्या कावडी यात्रेसाठी जाण्याची शकडो वर्षांची परंपरा आज हि सुरु आहे.
एकादशी दिवशी या पैकी काही कावडी कोथळ्याला मुक्कामाला जातात व दुस-या दिवशी द्वादशीला मुंगी घाटातून शिंगणापूर येथे प्रवेश करून महादेवास धार घालतात व तेरशीला महादेवाला धार घालून परतीला निघतात तर काही कावडी माळशिरसर हुन वाहनातून शिंगणापूरला जातात तर काही कावडीना नातेपुते येथील पर्वतेशेवर मंदिरातील शंकर पार्वती विवाह सोहळ्यास व-हडाचा मान आहे .हनुमान जयंती दिवशी मोठ्या भक्ती भावात फटाक्याच्या आतिश बाजीत मुरवणुकीने या कावडी उत्सवाची सांगता होती
















