अक्कलकोट – येथील फत्तेसिंह मैदानावर झालेल्या तालुकास्तरीय १९ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत सी. बी. खेडगी महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद पटकावले. या विजयामुळे संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
अंतिम सामन्यात संघाने फलंदाजी व गोलंदाजीमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सांघिक कौशल्याचे दर्शन घडविले. कर्णधार साहिल शेख याच्यासह आयान शेरीकर, निलेश जोशी, अभिषेक शिंदे, रितेश चव्हाण, स्वप्निल चव्हाण, ओमकार सुरवसे, यश पाटील, फरान शेख, रामचंद्र बिराजदार, समर्थ निंबाळ, शुभम कोळी आणि कुणाल कोळेकर यांनी संघाचे प्रतिनिधित्व केले.
संघाला क्रीडा शिक्षक प्रा. सोहेल शेख, जिमखाना विभागप्रमुख डॉ. दत्तात्रय बिराजदार व सुधीर राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, व्हाइस चेअरमन अशोक हारकुड, सचिव सुभाष धरणे, संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरलिंगप्पा धबाले, उपप्राचार्या वैदेही वैद्य, पर्यवेक्षक नीलप्पा भरमशेट्टी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.