सोलापूर – महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत . त्यामध्ये सोलापूर पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपायुक्त गौहर हसन यांची पुणे शहर येथे तर उपायुक्त विजय कबाडे यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली झाली आहे .
पोलीस उप आयुक्त गौहर हसन यांची पुणे शहर येथे उप आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे . त्यांच्या जागी नागपूर च्या सहाय्यक पोलीस अधीक्षक वृष्टी जैन यांची उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे .त्या सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांच्या पत्नी आहेत .
सोलापूर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ क्र १ चे उप आयुक्त विजय कबाडे यांची सोलापूर ग्रामीण येथे अपर पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली असून त्यांच्या जागी सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांची पोलीस उप आयुक्त म्हणून सोलापूर पोलीस आयुक्तालयात बदली झाली आहे .
























