Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देशाला परमवैभवाकडे नेणारा कार्यकर्ता घडवण्याचे ठिकाण म्हणजे संघ शिक्षा वर्ग : सचिन कुलकर्णी 

तरुण भारतbyतरुण भारत
May 16, 2026
in editor
0
देशाला परमवैभवाकडे नेणारा कार्यकर्ता घडवण्याचे ठिकाण म्हणजे संघ शिक्षा वर्ग : सचिन कुलकर्णी 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – स्वयंसेवकाला समाजात काम करण्यासाठी तयार करणारा हा ‘प्रथम शिक्षा वर्ग’ महत्त्वाचा आहे. ही कार्यकर्त्यांसाठी एक वैचारिक पर्वणीच आहे. पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत चालणाऱ्या विविध प्रकारच्या प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांचा गुणात्मक विकास या वर्गात केला जातो. हा वर्ग म्हणजे देशाला परम वैभवाकडे नेणारा कार्यकर्ता घडविण्याचे ठिकाण आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहकार्यवाह सचिन कुलकर्णी यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या सोलापुरातील संघ शिक्षा वर्गाचा प्रारंभ हरिभाई देवकरण प्रशालेत शुक्रवारी झाला. याप्रसंगी त्यांनी स्वयंसेवकांना संबोधित केले.

याप्रसंगी व्यासपीठावर महापौर विनायक कोंड्याल, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक सुरेश जाधव, या वर्गाचे सर्वाधिकारी कराडचे जिल्हा सहसंघचालक शशिकांत फिरंगे

उपस्थित होते. भारत मातेच्या पूजनाने वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.

सचिन कुलकर्णी यांनी पुढे बोलताना संघाचे वैचारिक अधिष्ठान मजबूत असल्यानेच त्याची तुलना इतर कोणत्याही संघटनेशी होऊ शकत नाही, असे पूजनीय सरसंघचालक म्हणूनच म्हणतात असे सांगितले. संघ कोणत्याही जातीचा नसून, तो सर्व भारतीयांना संघटित करतो. घरात भांडे कोणतेही असले तरी त्यातील पाणी ‘हिंदुत्वाचेच’ आहे, इतक्या सोप्या भाषेत संघाचे स्वरूप स्पष्ट होते. या वर्गात शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक अशा तीन वेगवेगळ्या श्रेणींतील कार्यकर्ते संघाच्या कार्यपद्धतीचा जवळून अभ्यास करतील. अखिल भारतीय स्तरावरील कार्यकर्ते त्यांच्या शंकांचे निरसन करून कार्यवृद्धीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. संघशताब्दीसाठी कार्यकर्त्यांच्या पाच पिढ्या खर्ची पडल्या असून, आता सहावी पिढी हे वैचारिक अधिष्ठान पुढे नेण्यासाठी सरसावली आहे. ​या वैचारिक अधिष्ठानातूनच समाजात परिवर्तन घडवणारे कार्यकर्ते तयार होतील. त्यामुळे सर्व स्वयंसेवकांनी समाजाप्रती कर्तव्य भावना व सहजीवनाची सवय लावून घेत संघ कामाचा प्रभाव सर्वत्र वाढवण्याचा प्रण करावा, असे आवाहन सह प्रांत कार्यवाह सचिन कुलकर्णी यांनी केले. 

——————

 

महापौर विनायक कोंड्याल यांनी मनोगत व्यक्त करताना, संघ विचारांचा पहिल्यापासूनच माझ्यावर प्रभाव आहे. माझ्या वडिलांवरही संघाचा संघाप्रती माझ्या मनात नितांत आदर आहे. संघ विचार हा एक संस्कारच आहे. या वर्गाचा उद्घाटक म्हणून मला आमंत्रित केले हे मी माझे भाग्य समजतो. राष्ट्र प्रेमाचे संघाचे धोरण माझ्या मनाला भावले आहे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी संघाचे मार्गदर्शन घेत राहणार. 

———————

मोबाईल विरहित वर्ग

सलग १५ दिवस चालणारा या वर्गात सर्व स्वयंसेवकांकडे मोबाईल नसणार आहे. या वर्गात पहाटे ५ वाजल्यापासून रात्री १०.३० पर्यंत, वेळेचे नियोजन, शारीरिक, बौद्धिक प्रशिक्षण यासोबतच सेवाव्रत, सामाजिक समरसता आदी बाबींचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Post Views: 10
Previous Post

रचना ऑफिसर्स सोशल असोसिएशनची बैठक; उपवर्गीकरणावर चर्चा हरकती नोंदवा

Next Post

उपायुक्त गौहर हसन पुणे शहर व विजय कबाडे यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उपायुक्त गौहर हसन पुणे शहर व विजय कबाडे यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली

उपायुक्त गौहर हसन पुणे शहर व विजय कबाडे यांची सोलापूर ग्रामीण येथे बदली

ताज्या बातम्या

छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आचरणात आणून समाजोपयोगी कार्य करा

छत्रपती संभाजी महाराजांचे विचार आचरणात आणून समाजोपयोगी कार्य करा

May 16, 2026
मराठा सेवा संघाचे छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक वाचनालय सुरु

मराठा सेवा संघाचे छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक वाचनालय सुरु

May 16, 2026
गाणगापुर रस्त्याचे नुतनीकरण; सोलापुरसाठी नवा रिंग रोड बनवा

गाणगापुर रस्त्याचे नुतनीकरण; सोलापुरसाठी नवा रिंग रोड बनवा

May 16, 2026
केंद्रीय रस्ते व वाहतूक महामंत्री नितीन गडकरी  यांचा लोकप्रिय खा.प्रणिती शिंदे यांच्या वतीने सत्कार

केंद्रीय रस्ते व वाहतूक महामंत्री नितीन गडकरी  यांचा लोकप्रिय खा.प्रणिती शिंदे यांच्या वतीने सत्कार

May 16, 2026
उन्हाळी परंपरांचा सुगंध अजूनही जिवंत; ज्येष्ठ महिलांकडून कुरड्या-पापड्यांची परंपरा जपली जातेय

उन्हाळी परंपरांचा सुगंध अजूनही जिवंत; ज्येष्ठ महिलांकडून कुरड्या-पापड्यांची परंपरा जपली जातेय

May 16, 2026
प्रशासनाचा ‘लोकदूत’ म्हणून पुढाकार: ‘समाधान शिबिरा’चा यशस्वी समारोप!

प्रशासनाचा ‘लोकदूत’ म्हणून पुढाकार: ‘समाधान शिबिरा’चा यशस्वी समारोप!

May 16, 2026
जनगणना २०२७ घर गणना प्रक्रियेत अचूक माहिती देऊन सहकार्य करावे

जनगणना २०२७ घर गणना प्रक्रियेत अचूक माहिती देऊन सहकार्य करावे

May 16, 2026
क्रांतिवीर फकिरा चौकाचे समाजसेवक दत्ता पेठे यांच्या उपस्थितीत सुशोभीकरण

क्रांतिवीर फकिरा चौकाचे समाजसेवक दत्ता पेठे यांच्या उपस्थितीत सुशोभीकरण

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0866249

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697