बार्शी – ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी यांच्याकडून श्री काळभैरवनाथ सोनारी येथील देव दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोफत ४०० जीआर चे पाणी वाटप
बुधवारी सकाळी नऊ ते पाच या वेळेत मोठ्या प्रमाणात भाविकांना करण्यात आले. उष्णतेची तीव्रता लक्षात घेता गेली तीन वर्ष श्री काळभैरवनाथ सोनारी येथे यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना मोफत पाणी वाटण्यात येते. हे पाणी बार्शीतील दानशूर व्यक्ती, मित्र परिवार, संस्थेतील सभासद नाव न टाकणाऱ्या अटीवर निधी संस्थेच्या अकाउंटवर दिला जातो. तसेच काही मित्र परिवाराकडून ही पाणी संकलन केले जाते या सर्वांच्या सहकार्यामुळेच भाविकांची तहान भागविली जाते.
भाविक पाणी पिल्यानंतर मोठ्या अंतकरणातून संस्थेस व पाणी देणारे यांना आशीर्वाद देऊन आपले कार्य अखंडपणे चालू राहावे असे काळभैरवनाथ यांच्या चरणी प्रार्थना करुन काळभैरवनाथाचे चांगभलं असे म्हणून आशीर्वाद देऊन जातात.
पाणी वाटप कार्यक्रमासाठी अध्यक्ष राहुल वाणी, सचिव अजय तिवारी, सहसचिव नागनाथ सोनवणे, खजिनदार माणकोजी ताकभाते, रवि वाणी, भरत जाधव, सुनिल नवले, विजय मामा येवारे, अतुल वाणी, अण्णा जाधव, सागर घंटे, सुरज हाजगुडे, संदीप वाणी, धीरज परदेशी, पिंटू मस्के श्रीमंत चव्हाण, भारत झेंडे, आकाश सोनटक्के, संदीप तवले, रेखा विधाते, रागिनी झेंडे, कोमल वाणी, अनुसया आगलावे सुनिता गायकवाड तसेच ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. भाविकांना पाणी वाटप केल्यामुळे तेथील पंच कमिटीने संस्थेचे आभार व्यक्त केले.


























