श्रीपूर – मुळचे श्रीपूर ता . माळशिरस येथील सुवर्ण सहकारी बॅन्केतील माजी जेष्ठ अधिकारी चिंतामणी बाळकृष्ण कुलकर्णी सध्या वास्तव्य पुणे यांची यजुर्वेदीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ,पुणे या संस्थेचे विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली . ही संस्था राज्य पातळीवर काम करते. या संस्थेच्या माध्यमातून कै.त्र्यंबक मार्तंड केंघे विद्यार्थी वसतिगृह, कै.श्रीमती सिंधुताई त्र्यंबक केंघे अतिथी गृह , कात्यायनी वधुवर केंद्र (महाराष्ट्र व गुजरात येथे विविध केंद्रे कार्यान्वित), युवा याज्ञवल्क्य उद्योजक विकास अभियान , याज्ञवल्क्य नागरी सहकारी पतसंस्था या शाखेच्या माध्यमातून सामााजिक उपक्रम राबविले जातात .
यामध्ये विद्यार्थ्यांसाठी परतफेड शिष्यवृत्ती , आर्थिक मदत , वेदविद्या संवर्धन अशी विविध समाजिक कामांचा अंतर्भाव आहे . गेेल्या ७५ वर्षा पासून संस्थेचे अविरत कार्य सुरू आहे .संस्थेची नारायण पेठ, पुणे येथे १५००० चौरस फूटाची जागा व स्वमालकीचे कार्यालय आहे. वरील संस्थेचे कार्य विश्वस्तांमार्फत चालते.यावर्षी या संस्थेच्या विश्वस्त मंडळात श्री.चिंतामणी बाळकृष्ण कुलकर्णी,रा.श्रीपूर ता. माळशिरस जिल्हा सोलापूर.यांची विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली आहे .चिंतामणी कुलकर्णी हे एम कॉम तसेच जीडीसीए असे उच्च शिक्षित आहेत.त्यांनी सुवर्ण सहकारी बँक, श्रीपूर शाखेत ३७ वर्षे सेवा केली आहे. याज्ञवल्क पतसंस्थेत अधिकारी , संस्थेचे इंटरर्नल ऑडिटर म्हणून काम केले आहे..त्यांच्या विश्वस्त म्हणून नियुक्तीबाबत विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

























