Sunday, April 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वाळवंटात सीसीटिव्ही यंत्रणा कार्यान्वीत तरी देखील वाळू चोरी होतेच कशी ? नागरिकांचा महसूल आणि पोलिस प्रशासनाला सवाल

तरुण भारतbyतरुण भारत
January 18, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – येथील चंद्रभागेच्या वाळवंटात वाळू चोरी रोखण्यासाठीचा जालीम उपाय म्हणून प्रशासनाकडून लाखो रुपये खर्चुन सीसीटिव्ही कँमेरे बसविण्यात आलेले आहेत. मात्र येथील सीसीटिव्ही कँमेऱ्यांची अवस्था बघितली तर ते कार्यान्वीत आहेत की बंद अवस्थेत असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित झाल्या शिवाय रहात नाही. कारण जर कँमेरे चालू स्थितीत असतील तर गाढवावरुन होणारी वाळू चोरी बंद का होत नाही असा संतप्त सवाल पंढरपूरवासियांकडून उपस्थित केला जात आहे.

पंढरपूर हे राज्यातीलच नव्हे तर देशातील एक प्रमुख तिर्थक्षेत्र आहे. येथील विठ्ठलाच्या दर्शनाला जेवढे महत्व आहे तेवढेच महत्व चंद्रभागा स्नानाला आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येथे आलेले प्रत्येक भाविक दर्शना अगोदर चंद्रभागेच्या वाळवंटात स्नानासाठी जात असतो. जरी त्याने स्नान केले नाही तरी तो हातपाय धुवून चंद्रभागेचे तिर्थप्राशन करुन मगच विठुरायाच्या दर्शनासाठी येथील मंदिरात जात असतो.

चंद्रभागेच्या विस्तीर्ण वाळवंटाची गेल्या दहा, बारा वर्षापासून अवस्था अत्यंत बकाल झालेली दिसत आहे. वाळवंट बकाल होण्याचे प्रमुख कारण म्हणजे चंद्रभागेच्या पात्रातून होणारी वाळू चोरी, पंढरपूर शहरात गाढवावरुन शेकडो ब्रास वाळू चोरी दररोज होते आहे. मात्र ही वाळू चोरी प्रशासनाला प्रशासनातील काही आधिकाऱ्यांची वाळू माफियां बरोबर असलेल्या अर्थपुर्ण मैत्रीमुळे अद्यापही रोखता आलेली नाही. मध्यंतरीच्या काळात वाळू चोरी रोखण्यासाठी वाळवंटा मध्ये सीसीटिव्ही कँमेऱ्यांचे जाळे उभारण्यात आले. ते उभारत असताना त्या मध्ये काही फिरते कँमेरे देखील लावण्यात आले. जेणे करुन वाळवंटातील दूरवर देखील कँमेऱ्याची नजर राहून होणाऱ्या वाळूचोरीला कुठेतरी आळा बसु शकेल.

दरम्यान वाळवंटात आज पाहिले तर नदी पात्रा शिवाय इतर ठिकाणी वाळू कुठेही दिसत नाही. पूर्वी वाळवंटातून जाताना सर्वसामान्य माणासाला वाळुतून चालणे कठीण होत असे. नगरप्रदक्षिणा करणार्यांना वाळूतून पायी चालत असताना अक्षरश: दम लागत असे. मात्र वाळवंटात आज मितीला वाळू कुठेच दिसत नाही. अगदी वाळू खरडून काढल्यामुळे वाळवंटातील वाळूच्या खाली असलेले मातीचे साम्राज्य सर्वत्र दिसत आहे. 
जर वाळू चोरी रोखण्यासाठी हे सीसीटिव्ही कँमेरे बसविले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असेल तर अद्याप पर्यंत वाळवंटातील ऐवढी वाळू चोरी झालीच कशी ?, दिवसाढवळ्या सुरु असलेली वाळू चोरी अर्थपूर्ण मैत्रीमुळेच प्रशासनातील काही अधिकाऱ्यांच्या दृष्टीस पडत नसेल मात्र सीसीटिव्ही यंत्रणाव्दारे तरी ती उघड का होत नाही ? असे एक ना अनेक सवाल पंढरपूरवासियांकडून उपस्थित केले जात आहेत.
——————-

मध्यंतरीच्या काळात चंद्रभागेच्या वाळवंटातील वाळू चोरी रोखण्यासाठी प्रशासनाकडून जे सीसीटिव्ही कँमेरे बसविण्यात आले त्यांची क्वाँलिटी अतिशय उत्तम अल्याचे सांगितले गेले. कारण वाळवंटाचे विस्तीर्ण क्षेत्र कँमेऱ्यात टिपता यावेत यासाठी ते अतिउच्च दर्जाचे बसविले गेले होते. अगदी पुंडलिक मंदिरा पासून ते अंबाबाई मंदिरा जवळील बंधाऱ्या पर्यंत आणि इकडे विष्णूपद मंदिरापर्यंतचे क्षेत्र हे कँमेरे कव्हर करु शकतात. त्यामुळे वाळंटातील वाळू चोरीला निश्चित आळा बसेल असे छातीठोकपणे तत्कालीन अधिकारी सांगत होते. मात्र वाळवंटातील सध्याची स्थिती पाहिली तर तेथील कँमेरे चालू आहेत की बंद असा सवाल निश्चितच उपस्थित होतो आहे.

Post Views: 34
Previous Post

अक्कलकोट काँग्रेस कडून जि.प. पं. स. इच्छुकांची घेतल्या मुलाखती

Next Post

मास्टरमाईंड स्पर्धेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मास्टरमाईंड स्पर्धेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे उल्लेखनीय यश

ताज्या बातम्या

तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींना इमारत निधी मंजूर – आ.डॉ.बाबासाहेब देशमुख

तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींना इमारत निधी मंजूर – आ.डॉ.बाबासाहेब देशमुख

April 26, 2026
मंद्रूप ग्रामपंचायतचा अजब कारभार; नवीन शौचालयाला कुलुप लावून केले बंद

मंद्रूप ग्रामपंचायतचा अजब कारभार; नवीन शौचालयाला कुलुप लावून केले बंद

April 26, 2026
आर्या पिंपळनेरमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात; १५०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

आर्या पिंपळनेरमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात; १५०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

April 26, 2026
खा. प्रणिती शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद

खा. प्रणिती शिंदे यांच्या गाव भेट दौऱ्याला उस्फूर्त प्रतिसाद

April 26, 2026
मनोहर मामाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तीन दिवसाची पोलीस कोठडी

मनोहर मामाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; तीन दिवसाची पोलीस कोठडी

April 26, 2026
‘किंगमेकर’ आता विधीमंडळात धडकणार? चंद्रकांतदादांनी दिलेलं ‘ते’ घड्याळ आणि मुख्यमंत्र्यांच्या हातातील ‘गिफ्ट’

‘किंगमेकर’ आता विधीमंडळात धडकणार? चंद्रकांतदादांनी दिलेलं ‘ते’ घड्याळ आणि मुख्यमंत्र्यांच्या हातातील ‘गिफ्ट’

April 26, 2026
न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र

न्याय द्या, नाहीतर प्राण देईन! जयश्री कटके यांचे आमरण उपोषण तीव्र

April 26, 2026
रेणुका महागांवकर यांचा हृदयस्थ काव्यसंग्रह हृदयात स्थिरावणारा आहे –  कवी अशोक नायगांवकर

रेणुका महागांवकर यांचा हृदयस्थ काव्यसंग्रह हृदयात स्थिरावणारा आहे –  कवी अशोक नायगांवकर

April 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0830107

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697