सोलापूर – फिरदोस महिला शिक्षण व समाज सेवा संस्था संचलित चाँद तारा उर्दू प्राथमिक शाळा सोलापूर इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर शाळेच्या अध्यक्षा डॉ. जन्नतबी बागबान, बाशीर बागबान, डॉ. परेवजआलम आतनूरकर, नूरूलऐन अतनूरकर, मुख्याध्यापक गजाला सौदागर, सदबजहा अतनुरकर आदी उपस्थित होते.
यावेळी सातवीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभात आपले मनोगत व्यक्त केले आणि शाळेने उत्कृष्ट शिकविल्याने आमचे भविष्यात त्याचे चांगले उपयोग होईल, असे विचार व्यक्त केले.
तसेच नुकत्याच सीबीएससी दहावीचा निकाल लागला असून त्यात आय.एम.एस. शाळेत दहावी वर्गात शिकणारी नूरुल ऐन परवेज आलम आतनुरकर यांनी ९४.४० टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शाळेच्यावतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आला होता. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व उज्व्यल यश संपादन करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.



























