सोलापूर – छत्रपती संभाजी महाराज आणि ताराराणी यांच्या बाबत चुकीच वक्तव्य करून खोटा इतिहास सांगणारे जैन मुनी आचार्य नयन यांचा तमाम शिव-शंभू भक्तांकडून जाहीर निषेध करत जैन मुनी आचार्य नयन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्या घटनेचा व्हिडिओ पुरावा राऊत हा दाखवण्यात आला.
ताराराणी शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकल्या सुनबाई म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांच्या धर्मपत्री होत्या. धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बलीदान दिले. राजांची बदनामी करणाऱ्या व चुकीचे इतिहास सांगणाऱ्यांचा जाहीर निषेध केला. असे चुकीचे इतिहास सांगणाऱ्या जैनमुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा. तात्काळ गुन्हा दाखल झाला नाही तर मराठा समाज, शिवशंभू भक्त रस्त्यावर आंदोलन करेन अशा इशारा मराठा आंदोलक तथा मराठा क्रांती मोर्चा राज्यसमन्वयक राम जाधव यांनी दिला.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हा संपर्क प्रमुख छत्रगुण माने, किरण शिरसागर, सागर गायकवाड, अक्षय माळोदकर, शुभम खटमोडे आदी जन शिवशंभो भक्त उपस्थित होते.
जैन मुनींनी काय म्हटले होते
शिवाजी के पुत्र को पकडा, उनके दोनो आखे निकाल दिये, उनके शरीर के तुकडे तुकडे करके कुत्तो को खिला दिये !
हमारे लोगो को पकड पकड कर उबलते तेलो मे तला गया और ऐसे समय पर एक औरत जैन राणी का उदय हुआ ताराबाई देवी का जन्म हुआ और उन्होने युद्ध करा और औरंगजेब को एक जैन राणीने धुल चटादि ये जैन राणी का इतिहास हे
ये इतिहास जैन महिलाओ का इतिहास हे.





















