Thursday, June 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात पार; पारंपरिक वैभव, भक्तीमय वातावरणात भव्य सोहळा

तरुण भारतbyतरुण भारत
April 3, 2026
in editor
0
‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात पार; पारंपरिक वैभव, भक्तीमय वातावरणात भव्य सोहळा
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – सोमवारी  पार पडलेले ‘विराट हिंदू संमेलन’ पारंपरिक वैभव, सांस्कृतिक दर्शन आणि भक्तीमय वातावरणामुळे विशेष ठरले. संपूर्ण कार्यक्रमात हिंदू संस्कृतीचे जिवंत चित्र उभे राहिले.

कार्यक्रमस्थळी आकर्षक सभामंडप उभारण्यात आला होता. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांचा देखावा साकारण्यात आला होता. तसेच शिवरायांची भव्य मूर्ती आणि प्रभू श्रीराम यांची मूर्ती आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. सभामंडप परिसरात मशाली, परमपवित्र भगवा ध्वज आणि पारंपरिक सजावटीमुळे वातावरण भारावून गेले होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने गांधी चौकातून भव्य स्वागत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ह.भ.प अनिल महाराज देवळेकर आणि श्रीपादतीर्थ स्वामी महाराज यांचे जिप्सीद्वारे स्वागत करण्यात आले. जय शंकर उद्यानापर्यंत ही मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली.

जय शंकर उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज  यांना हार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यानंतर शिवरायांची पालखी विजय चौकाच्या दिशेने मार्गस्थ झाली.

या पालखीत लहान वारकरी मंडळ, भगवा ध्वज, भजनी मंडळ तसेच हलगी वादकांचा सहभाग होता. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात पालखी विजय चौकात पोहोचली. येथे पालखी आणि महाराजांचे फुलांच्या वर्षावात भव्य स्वागत करण्यात आले. अबदागिरी, मशाली आणि भगवा ध्वजांनी सजलेले पालखीचे स्वरूप सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

विजय चौकात आगमनानंतर अनिल महाराज देवळेकर व श्रीपादतीर्थ स्वामी महाराज यांचे महिलां भगिनींनकडून पारंपरिक औक्षण करण्यात आले. औक्षणानंतर गाईचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शंखनाद करण्यात आला व शिवगर्जना देत वातावरण दणाणून सोडण्यात आले.

पुढे कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करत प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर श्रीपादतीर्थ स्वामी महाराज यांनी आशीर्वचन देत उपस्थितांना धर्म, संस्कार आणि एकतेचा संदेश दिला. यानंतर मनीष बोत्रे यांनी ‘पंच परिवर्तन’ विषयी मार्गदर्शन केले. 

गौरवशाली शताब्दी वर्षांमध्ये पदार्पण यानिमित्त संघ शताब्दी विशेषांक या पुस्तकाचे प्रकाशन उपस्थित  प्रमुख वक्त्यांच्या हस्ते करण्यात आले.

व सर्व हिंदू बांधवांपर्यंत हा इतिहास पोहोचावा यासाठी पुस्तक विक्री स्टॉल सुद्धा उपलब्ध करण्यात आला होता.

त्यानंतर ह.भ.प अनिल महाराज देवळेकर यांनी ‘हिंदू समाज प्रबोधन’ या विषयावर प्रभावी आणि ओजस्वी व्याख्यान देत एकता, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला.

या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील, माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते, अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या धर्मपत्नी देवण्यादेवी मोहिते पाटील, व इतर सर्वच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी  व मान्यवर,नगरसेवक  तसेच सकल हिंदू समाज संयोजक संजय एकतपुरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान सोलापूर जिल्हा कार्यवाहक प्रताप (दादा) साळुंखे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पंढरपूर जिल्हा प्रचारक मनीष जी बोत्रे यांच्यासह सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य व कार्यकर्ते, सर्व हिंदुत्ववादी संघटना गणेश उत्सव मंडळ, शिवजयंती मंडळ ,नवरात्र उत्सव मंडळ ,आधी संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकर्ते  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सांगता प्रेरणा मंत्र व ध्येय मंत्राने करण्यात आली. तसेच सकल हिंदू समाजाच्या वतीने उपस्थित सर्व हिंदू बंधू-भगिनींसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

एकूणच, पारंपरिक दिमाख, धार्मिकता आणि सामाजिक एकात्मतेचा संगम घडवणारे ‘विराट हिंदू संमेलन’ अकलूजमध्ये सकल हिंदू समाज च्या वतीने व सर्व कार्यकारणीच्या मेहनतीने यशस्वीरीत्या आणि अत्यंत उत्साहात पार पडले.

हे हिंदू संमेलन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्यांनी तन-मन-धन उपलब्ध करून दिले त्या सर्वांचे सकल हिंदू समाजाच्या वतीने आभार मान्यात आले.

Post Views: 33
Previous Post

जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्यावर गुन्हा दाखल करा

Next Post

‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयातील खेळाडूंची यशस्वी कामगिरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयातील खेळाडूंची यशस्वी कामगिरी

‘एल.बी.पी.एम.’ महाविद्यालयातील खेळाडूंची यशस्वी कामगिरी

ताज्या बातम्या

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

June 10, 2026
राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

June 10, 2026

सीईटी-पीसीबी परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

June 10, 2026

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

June 10, 2026

स्मार्ट सिटीत कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष 

June 10, 2026

मनपा क्षयरोग अधिकारी डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी

June 10, 2026
एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

June 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902987

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697