Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आधी प्रणिती शिंदेंविरोधात दंड थोपटत काँग्रेस सोडली, आता त्यांच्याच प्रचाराची तयारी, दिलीप माने घरवापसीच्या तयारीत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
March 21, 2024
in solapur
0
आधी प्रणिती शिंदेंविरोधात दंड थोपटत काँग्रेस सोडली, आता त्यांच्याच प्रचाराची तयारी, दिलीप माने घरवापसीच्या तयारीत
0
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर लोकसभा मतदारसंघात मोठ्या राजकीय उलथापालथी सुरु झाल्या आहेत. लोकसभेच्या निवडणुकी अगोदर आमदार प्रणिती शिंदे आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी प्रचाराचा अप्रत्यक्षपणे नारळ फोडला आहे. बुधवारी सोलापूर शहरातील शिवसेनेच्या नेते दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावून मतं जाणून घेतली. यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची मागणी करत विरोधकांना धक्का दिला आहे.

माजी आमदार व शिवसेना नेते दिलीप माने यांनी सोलापूर कोल्हापूर महामार्गावर एका महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन सर्वांचं ऐकलं आणि काँग्रेसमध्ये जाण्याची घोषणा केली. आगामी विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची इच्छा देखील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप माने यांनी शिवसेनेकडून प्रणिती शिंदे यांच्याविरोधात मध्य सोलापूरमधून निवडणूक लढवली होती. प्रणिती शिंदेंना आमदारकीच्या निवडणुकीत पाडण्यासाठी दिलीप मानेंनी मोठी ताकद लावली होती. आता मात्र लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या दिलीप माने यांना काँग्रेसचे काम करावे लागणार आहे.

 

एक वेळा आमदार दोन वेळा पराभव, प्रणितींच्या विरोधात जोरदार प्रचार

दिलीप माने यांची दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसचे मोठे नेते म्हणून ओळख होती. २००९ मध्ये काँग्रेसकडून त्यांनी दक्षिण सोलापूरमधून विधानसभा निवडणूक लढवत विजय मिळवला होता. २०१४ मध्ये भाजपच्या सुभाष देशमुख यांनी दिलीप मानेंचा पराभव केला होता.२ ०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप माने यांनी थेट मतदारसंघ बदलला आणि प्रणिती शिंदेंच्या विरोधात शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला. शिवसेनेत दिग्गज नेते अगोदरपासून असताना देखील शिवसेनेने पक्षातील जुन्या नेत्यांना डावलून काँग्रेसमधून आलेल्या दिलीप माने यांना तिकीट दिले होते. २०१९ साली सोलापूर शहर मध्य विधानसभेच्या निवडणुकीत दिलीप माने यांनी प्रणिती शिंदेना टक्कर देत चौथ्या क्रमांकाची मते प्राप्त केली होती.प्रणिती शिंदे यांना पाडण्यासाठी दिलीप माने यांनी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार केला होता. आता मात्र लोकसभा निवडणुकीत प्रणितींचं काम करण्याची वेळ दिलीप मानेंवर आली आहे.

 

काँग्रेसमध्ये जाण्याचे अप्रत्यक्ष संकेत

राज्यात उद्धव ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकार आले आणि शिवसेना पक्षात देखील फूट पडली होती. माजी आमदार दिलीप माने यांनी राज्यातील राजकीय उलथापालथनंतर स्वतःची राजकीय भूमिका स्पष्ट केली नव्हती. अनेक दिवस संभ्रमात राहिल्यानंतर, स्वतःच्या व्यवसायात मग्न असणाऱ्या दिलीप माने यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकी अगोदर राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. कार्यकर्त्यांच्या आग्रहाचं कारण देत काँग्रेस मध्ये जाण्याचं दिलीप माने यांनी सांगितले.

 

विधानसभा निवडणुकीत झालेली चूक २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुधारणार?

२०१९ साली दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ सोडून मध्य विधानसभा मतदारसंघातून नशीब आजमावणाऱ्या दिलीप मानेंनी घोडचूक केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अनेक दिवसांपासून होती. २०१९ मध्ये आमदारकीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नवख्या उमेदवाराने भाजपच्या सुभाष देशमुख यांना कडवी झुंज देत दुसऱ्या क्रमांकाची मते प्राप्त केली होती. २०१९ मध्ये दिलीप माने यांनी भाजपच्या सुभाष देशमुख यांच्या विरोधात दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणूक लढली असती तर ते आज आमदार झाले असते, अशा चर्चा अनेकदा राजकीय वर्तुळात केल्या गेल्या आहेत. २०१९ मध्ये झालेली चूक २०२४ च्या लोकसभा निवडणुकी अगोदर दिलीप मानेंनी सुधारून घेतली की काय, असे चित्र दिसून आले. कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मी मी काँग्रेसमध्ये जाणार असेही दिलीप माने यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले.

 

विधानसभा निवडणुकीत प्रणितींच्या विरोधात काम, आता प्रचाराची वेळ

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप माने यांनी प्रणिती शिंदेंच्या विरोधात दंड थोपटले होते. दिलीप मानेंनी शिवसेनेकडून विधानसभा निवडणूक लढवत प्रणितींना टक्कर दिली होती. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मध्य सोलापूर मधील माझ्या कार्यकर्त्यांनी मला काँग्रेसमध्ये जाण्याचा सल्ला दिला असेल आणि त्यांची इच्छा असेल तर मी काँग्रेसमध्ये जाणार आणि लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदेंचं काम करणार असे दिलीप माने यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले.

Post Views: 72
Previous Post

बॉबी देओलने एक स्क्रिनशॉर्ट शेअर करुन धोनीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला.

Next Post

अजित पवारांच्या सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस मधील नव्या पदाधिकाऱ्यांची निवडी जाहीर केली.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अजित पवारांच्या सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस मधील नव्या पदाधिकाऱ्यांची निवडी जाहीर केली.

अजित पवारांच्या सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस मधील नव्या पदाधिकाऱ्यांची निवडी जाहीर केली.

ताज्या बातम्या

सोलापुरात हँडबॉल दिन साजरा

July 26, 2026
पालखी सोहळ्याने दुमदुमले विद्यालय परिसर 

पालखी सोहळ्याने दुमदुमले विद्यालय परिसर 

July 26, 2026
आषाढी एकादशीनिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात ५०० बालवारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त सहस्त्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात ५०० बालवारकऱ्यांची भक्तिमय दिंडी

July 26, 2026
 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

 देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गावर जिल्हा परिषदेने केलेल्या नियोजनाचे केले कौतुक

July 26, 2026

सुमारे १५०० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मुख्यमंत्र्यांची गती

July 26, 2026

एसबी प्लाझा परिसरातील पाण्याचे तिन्ही नमुने पिण्यास योग्य

July 26, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महापौर विनायक कोंड्याल यांनी केले स्वागत 

July 26, 2026
भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची; आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1001076

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!