सोलापूर – भारत देशाच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक अरुण वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
यासोहळ्यास महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता नागनाथ वाघे, जिल्हा परिषद सदस्या चैताली मुळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड, मुख्य लेखा वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे,
प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख,
माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, अतिरिक्त मुख्य लेखा वित्त अधिकारी उबाळे, लेखाधिकारी श्रीकांत मिरगळे, लेखाधिकारी म्हाताऱ्या यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी, आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुर्णाकृती पुतळ्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य, सिईओ कुशल जैन, अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर, जिल्हा परिसर सदस्या चैत्राली मुळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी महिलांचे सुरक्षितते बाबत शपथ दिली. हरिभाई देवकरण प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय गीत वंदेमातरम, राष्ट्रगीत व राज्य गिताचे सुरेल आवाजात गायन केले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य व सिईओ कुशल जैन यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना भेटून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Post Views: 3