सोलापूर – दरवर्षीप्रमाणे यंदाही पदमशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय महामुनींचा रथोत्सव नारळी पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा निघणार असून या रथोत्सवात ‘श्री ओम साई प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांसाठी भव्य आणि नयनरम्य देखावा साकारण्यात येत आहे. यंदा राजस्थानमधील प्रसिद्ध श्री खाटूश्याम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असल्याची माहिती श्री ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तुषार अण्णा जक्का यांनी दिली. शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवाचे हे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. या भव्य देखाव्याची वैशिष्ट्ये, धार्मिक महत्त्व तसेच प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेली जय्यत तयारी करण्यात आली आहे.
*खाटूश्यामजींचे धार्मिक महत्त्व*
खाटूश्यामजींना भक्तांमध्ये ‘शीश के दानी’ आणि ‘हारे का सहारा’ म्हणून ओळखले जाते. पौराणिक कथेनुसार, महाभारतातील भीमपुत्र घटोत्कच यांचे पुत्र बर्बरीक हेच पुढे खाटूश्यामजी म्हणून पूजले जाऊ लागले.बर्बरीक हे अत्यंत पराक्रमी आणि धनुर्विद्येत निपुण होते. महाभारताच्या युद्धात त्यांनी सदैव पराभूत होणाऱ्या पक्षाच्या बाजूने लढण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यांच्या या प्रतिज्ञेमुळे युद्धाचा समतोल बदलण्याची शक्यता निर्माण झाली. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांची परीक्षा घेतली आणि बर्बरीक यांनी स्वतःचे मस्तक दान करून सर्वोच्च त्याग केला.त्यांच्या या त्यागामुळे भगवान श्रीकृष्णाने त्यांना वरदान दिले की, कलियुगात ‘श्याम’ या नावाने त्यांची पूजा केली जाईल. त्यामुळे खाटूश्यामजी हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहेत.राजस्थानमधील खाटू येथे असलेल्या खाटूश्याम मंदिराचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक मोठ्या संख्येने जातात. यंदा सोलापूरच्या श्री मार्कंडेय रथोत्सवातच खाटूश्याम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येत असल्याने सोलापूरकर भाविकांना राजस्थानला न जाता या देखाव्याचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
या पत्रकार परिषदेस श्री ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तुषार जक्का, वेदश्री वेणुगोपाल जिल्ला पतुंलु, किशोर रच्चा, पिंटू भाऊ जक्का, निखिल जक्का, प्रवीण गुंडला, प्रमोद जक्का ,चेतन गट्टी, गिरीश श्रीराम, अंबादास कुडक्याल, यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 54