सोलापूर : विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावण्यासाठी श्री गणपती शिक्षण प्रसारक संस्था, सोलापूर संचलित विमल कन्या प्रशाला व श्री शिवाजी मराठी विद्यालय येथे नुकताच ‘कृतज्ञता सोहळा’ अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे ‘समाजसेवा फाऊंडेशन’ व ‘श्री सिद्धेश्वर प्रशाला माजी विद्यार्थी संघटना’ यांचे अध्यक्ष ॲड. शिरीष दंतकाळे यांच्या सौजन्याने दोन्ही शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, शिष्यवृत्ती परीक्षा व NMMS स्पर्धा परीक्षेची मार्गदर्शक पुस्तके, तसेच वर्गांसाठी पंखे व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव उज्वला ढमाळ या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून विमल कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक ईरण्णा गोब्बूर उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्री शिवाजी मराठी विद्यालयाचे सहशिक्षक सुरेश पाटील यांनी केले. सुंदर व आकर्षक रंगीत फलक लेखन विमल कन्या प्रशालेच्या सहशिक्षिका आयरे यांनी केले तर आभार विमल कन्या प्रशालेचे सहशिक्षक प्रकाश जाधव यांनी मानले. विमल कन्या प्रशालेच्या सहशिक्षिका दिपीका उपाध्ये आणि शिक्षकेतर कर्मचारी सागर शिंदे, नितिन येडवे, श्रीमंत खांडेकर तसेच श्री शिवाजी मराठी विद्यालयाचे सहशिक्षक गुरुनाथ वमने, शिक्षकेत्तर कर्मचारी प्रभाकर कारंडे, मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
Post Views: 24