जालना – व्हिएतनाम येथील जागतिक पातळीवर स्पर्धेत जालन्याचे नाव उंचीवर नेऊन ठेवणारे पहिले आयर्नमॅन कैलास झोळगे ६०० किलोमिटर सायकलिंग केवळ ३३.४७ तासात पूर्ण करत आणखी एका विक्रमाची नोंद आपल्या नावावर करून जालना जिल्ह्याचे नाव नावलौकिक केले आहे. दरम्यान,अनिरुद्ध जुंबड यांनीही या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुपर रेडओनर किताब पटकावला आहे.
फ्रान्सच्या ‘ऑडेक्स क्लब पॅरिसियन (ACP) या जागतिक संस्थेच्या मान्यतेने दि.२६ जुलै २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील फिनिक्स क्लब येथून सकाळी ५.३० वाजता बी.आर.एम.सायकल स्पर्धेला सुरुवात करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर ते बीड – येरमाळा – तुळजापूर आणि परत छत्रपती संभाजीनगर अशी तब्बल ६०० किलोमिटरची ही जागतिक स्तरावर अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या सायकल स्पर्धेत जालन्याचे आयर्नमॅन कैलास झोळगे यांनी चमकदार कामगिरी करत तब्बल ६०० किलोमिटरचे डोंगराएवढे अंतर हवेच्या वेगाने कापत केवळ ३३.४७ तासात पूर्ण क
रून अव्वलस्थान पटकावले तर अनिरुद्ध जुंबड यांनी आपल्या पूर्ण शारीरिक कसोटीच्या जोरावर ३८.३० तासात यशस्वीरित्या अंतर पूर्ण केले.या यशाबद्दल बोलतांना कैलास झोळगे आणि अनिरुद्ध जुंबड म्हणाले की, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आम्ही मागील अनेक महिन्यांपासून कसून सराव केला. शिर्डी, शेगाव, राजूर, अंबड, देऊळगाव राजा या मार्गावर भरपूर सराव करत स्पर्धेसाठी योग नियोजन केले. या सरावाचा देखील मोठा फायदा या स्पर्धेत झाल्याचे त्यांनी सांगितले.आयपीएस अधिकारी संजय बारकुंड यांचे विशेष मार्गदर्शन आम्हाला लाभले आहे. आयपीएस बारकुंड यांनीही झोळगे आणि जुंबड यांच्या यशाबद्दल कौतुक करत त्यांचे हे यश आगामी पिढीतील सायकलपटूंसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या या यशाबद्दल डॉल्फिन स्पोर्ट्स ग्रुपचे अध्यक्ष नथुमल नाथानी, अनिल मालपानी,संगाप्पा चोकनपळे, विजय लोळगे,प्रदिप चेके, राहुल लबडे,अनिल पाटील, रामेक्ष्वर गोरे,विक्रांत मोंढे, राहुल साळवे,
योगेश वानखडे, विठ्ठल गाडेकर,संदिप डोंगरे, गणेश पवार,अरूण राकडे, सिद्धिविनायक झोळगे, दिपक खांडेभराड,शरद तोटे, प्रणव किनगावकर, स्पोर्ट्स ग्रुप, क्रीडाप्रेमी, सायकल संघटना, मित्र परिवार सर्व अधिकारी आदींनी आयर्नमॅन कैलास झोळगे आणि अनिरुद्ध जुंबड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
——————————
चौकट
—————
सायकल पंक्चर, मात्र जिद्द कायम
राखत स्पर्धेत मिळवले अव्वलस्थान
——————————
अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहभागी झालेले जालन्याचे आयर्नमॅन कैलास झोळगे यांची सायकल येरमाळा येथे नेमकी सायकल पंक्चर झाली. त्यात झोळगे यांचा दोन तासांचा वेळ वाया गेला. मात्र, जिद्दीच्या बळावर त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हवामान, खड्डे, पाऊस, आद्रता, चढ – उताराचा आणि दुसरीकडे वेळेचे कडक बंधन अशा आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत दोन तासांचा वेळ वाया जाऊनही जिद्द आणि अफाट सहनशक्तीच्या बळावर सदर ६०० किलोमिटरचे अंतर वेळेच्या आत पूर्ण करून कैलास झोळगे यांनी अव्वल स्थान मिळवत जालन्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.


















