माळशिरस – येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात व मोठ्या भक्तिभावात साजरी करण्यात आली . माळशिरस येथे जागृत हनुमान मंदीर आहे .या मंदिरातील हनुमानाची मूर्ती कललेली आहे त्यामुळे या हनुमानास झोपाळु हनुमान असेही म्हणतात. ही हनुमानाची मुर्ती जागृत असुन भाविकांची श्रद्धा आहे .
हनुमान जयंती निमीत्त मंदीरात काल रात्री जागर करण्यात आला त्यानंतर पहाटे पाच ते सुर्योदयापर्यंत ह भ प कैवल्य महाराज चातुर्मासे यांचे किर्तन झाले. सूर्यादया बरोबर उपस्थित भक्तांनी गुलाल व फुले टाकून हनुमान जन्मोत्सव साजरा केला. यावेळी पहाटेपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती यात माहिलांची लक्षणीय उपस्थिती होती. हनुमानाची मुर्ती स्वयंभु असल्याने अनेक भाविक या हनुमानास नवस बोलतात व आज हनुमान जयंती दिवशी हे भक्त आपले बोललेले नवस फेडण्यासाठी येतात.तसेच नोकरी निमित्त बाहेरगावी असलेले नागरिकही या ग्रामदैवताच्या उत्सवासाठी येतात.
हनुमान जयंती निमीत्त मंदीरात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच दिवसभर परिसरातील नागरीकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.जयंती निमित्त मंदीरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती .मंदीरात नारळ वाढविण्यासाठी आज पाटील कुटुबाचा मान असतो त्यामुळे माळशिरस चे पोलीस पाटील शितल पाटील, अमित पाटील, अभिजित पाटील व त्यांचे कुटबीय मंदीरात उपस्थित होते.
हनुमान जयंती निमीत्त मंदीर परिसरात यात्रा भरली होती , या यात्रेत अनेक प्रकारची दुकाने थाटण्यात आली होती लहान मुले व माहिलांनी तेथे खरेदी साठी एकच गर्दी केली होती .सायंकाळी पालखीतून श्री च्या पादुकांची नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आली.तसेच मंदिरात महाआरती करण्यात आली.


















