माळशिरस – ग्राम दैवत हनुमान जयंती निमित्त ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात पहिल्या क्रमांकाची कै बाजीराव देशमुख (वस्ताद) यांचे स्मरणार्थ एक लाख इनामाची पै.धनाजी कोळी व पै सतपाल सोनटक्के यांच्यातील कुस्ती बरोबरीत झाली त्याच बरोबर दुसऱ्या क्रमांकाची राहुल सूळ व कालीचरण सोलनकर तसेच तिसऱ्या क्रमांकाची सोनू सोनटक्के व अण्णा यमगर याही कुस्त्या बरोबरीत झाल्या .
हनुमान जयंती निमित्त येथील शाळेच्या क्रीडांगणावर १० रुपये पासून १ लाख रुपये इनामाच्या कुस्त्याचे आयोजन करण्यात आले होते.या तालुक्यातील पैलवानांनी उत्तम प्रतिसाद दिला . या कुस्ती स्पर्धेसाठी धनाजी मदने ,हनुमंत शेंडगे,सोमनाथ दडस यांनी समालोचक म्हणून काम पहिले .तर नामांकित पैलवानांनी पंचाची भूमिका बजावली .यास्पर्धेस पै .विजय देशमुख,माणिकराव वाघमोडे ,रावसाहेब मगर ,तुकाराम देशमुख,हिम्मत सोनवलकर,गौतम माने,सर्जेराव घोडके,सचिन वावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .


















