बार्शी – आर्य वैश्य समाज, बार्शी यांच्यावतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त स्वर संध्या ग्रुप, बार्शी यांच्या ‘हे चांदणे फुलांनी’ या हिंदी-मराठी सदाबहार गीतांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. देवी दुर्गा व लक्ष्मीमातेला नमन करून सुरू झालेल्या या कार्यक्रमाला व्यापारी वर्गासह नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला.
डॉ. मदन देगावकर, सूर्यकांत वायकर, सी.ए. डॉ. तेजस्विनी गपाट आणि सौ. गिरीजा पौळ यांनी पन्नासच्या दशकापासूनची अजरामर गीते सुरेल व भावपूर्ण शैलीत सादर करून रसिकांची मने जिंकली. *सौ. वैशाली जाधव यांनी गाण्यांचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि आठवणी उलगडत प्रभावी सूत्रसंचालन केले.
लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी एकाग्रतेने या स्वरमैफिलीचा आनंद घेतला. रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रमाला रंगत आली. आर्य वैश्य समाजातर्फे संपूर्ण स्वर संध्या ग्रुपचे कौतुक करून कलाकारांचा सन्मान करण्यात आला. सुरेल गायन आणि माहितीपूर्ण निवेदनामुळे ही मैफल बार्शीकरांसाठी संस्मरणीय ठरली.
सौ.व श्री. सुनील बंडेवार, सौ. व श्री. अरुण देबडवार, सौ. व श्री. शंकर महाजन, सौ. व श्री. विजयकुमार गुडमेवार आणि सौ. व श्री. शुभम गुंडेवार यांच्या मोलाच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
Post Views: 10