बार्शी – बार्शी शहर पोलिसांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करुन एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून सोन्याचे दागिने (१,५०,५००/- रु.) व पल्सर वाहन (८००००/- रु.) असे एकूण रुपये २,३०,५००/- हस्तगत करण्यात यश मिळवले आहे. गुन्ह्यातील अन्य आरोपीचा शोध सुरू आहे.
फिर्यादी श्री. विकास लक्ष्मण हिंगमिरे (वय ४६ वर्षे, रा. प्लॉट नं. १, बालाजी व्हीला, जुनी विडी घरकुल, सोलापूर)
यांच्या फिर्यादीवरुन बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र ८०४/२०२६, भा. न्या. सं. ३०४(२), ३(५),२३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दि. १७/१०/२०२६ रोजी रात्रीच्या सुमारास फिर्यादी व त्यांची पत्नी हे कासारवाडी रोड, बार्शी परिसरातून जात असताना मोटारसायकलवरुन आलेल्या आरोपींनी त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. चोरीस गेलेल्या सोन्याच्या ४८ ग्रॅम वजनाच्या दागिन्यांची अंदाजे किंमत रुपये २,१०,३९९/- होती. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान बार्शी शहर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची दिशा निश्चित केली. तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार आरोपी महादेव शंकर पवार यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यातील सोन्याच्या दागिन्यांचे तुकडे हस्तगत करण्यात आले.
आरोपीचे नाव महादेव शंकर पवार, वय ३३ वर्षे, रा. महाळुंग, श्रीपूर, ता. माळशिरस असे आहे.
तपासादरम्यान आरोपीकडून पुढील सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. १) सोन्याच्या मंगळसूत्राचे चार वेगवेगळ्ळ्या आकाराचे तुकडे वजन २८.६७० ग्रॅम. २) सोन्याचे डोरले वजन ५.६७० ग्रॅम. ३) एकूण सोन्याचे वजन ३४.३४० ग्रॅम.
हस्तगत केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची अंदाजे किंमत रुपये १,५०,५००/-.तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन पल्सर ८००००/-.
गुन्ह्यातील अन्य आरोपी विनोद गोविंद पिंपळे याचा शोध सुरु आहे. त्याचेकडून उर्वरीत सोने जप्तीच्या अनुषंगाणे आणि आरोपींनी अशाच प्रकारचे इतर गुन्हे केले आहेत का, याबाबत पुढील तपास सुरु आहे.
सदरची कामगिरी श्री. अतुल कुलकर्णी (पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण), श्री. विजय कबाडे (अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण) व श्री. सुहास जगताप (उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी) यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पोसई अभयकुमार माकणे, पोहेकॉ प्रवीण साठे, पोहेकाॅ शबाना कोतवाल, धनराज फत्तेपूरे, प्रल्हाद अकुलवार, सचिन देशमुख, अंकुश जाधव, अजिज शेख, राहुल उदार, सचिन नितनाथ, अविनाश पवार, सतीश उघडे, दत्ता सोमवाड, सचिन राऊत, संतोष जाधवर, लक्ष्मण शेळके, तसेच सायबर पोलीस ठाणे येथील राहुल सोनकर यांनी पार पाडली आहे.