पुढे बोलताना शिव तर साधा भोळा असून भगवंत प्राप्ती साठी उच्च – निच असा भेदभाव त्याच्या पाशी नसून फक्त अंतकरणातून मारलेली आर्त हाक पुरेशी आहे असल्याचे सांगून अनिल जाधव यांनी श्रावण महिन्यात याचा योग जुळवून आणत्याने हे शक्य झाल्याचे सांगितले .
श्रीपूर येथे ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात शिवमहापुरण कथा संप्पन्न झाली .
पांडुरंग कारखान्याचे संस्थापक कै . सुधाकरपंत परिचारक यांचे पुण्यतिथि निमित्त महाळुंगचे माजी पं . स . सदस्य अनिल सज्जन जाधव मित्र परिवाराच्या वतीने शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते त्याच्या सांगता समारोपात निरुपण करताना त्या बोलत होत्या .
याप्रसंगी स .म . साखर कारखान्याचे माजी व्हा . चेअरमन रामचंद्र सावंत – पाटील, ज्ञानेश्वर मुंडफणे, महादेव चव्हाण , अनिल मुंडफणे , जगन्नाथ गणेशकर उपस्थित होते .
महाळुंग – श्रीपूर परिसरात पहिल्यांदाच शिवमहापुराण कथा होत असल्याने भाविकांना कथा श्रवणाचा चांगला लाभ झाला .
*सजिव दृष्य आकर्षण ठरले*
सात दिवस चाललेल्या या कथे मध्ये शिवमहापुराण कथे मधिल विविध प्रसंग यात शिव – पार्वती विवाह सोहळा, समुद्र मंथन, शिवतांडव नृत्य याचे सजिव देखावे साकारल्याने श्रोत्यांसाठी आकर्षण ठरले .
महोत्सव पार पाडण्यासाठी राजू काळेल , नितीन जाधव , ज्ञानेश्वर काटे, शैलेश पवार, हरी घाडगे , बजरंग भोसले , सचिन नागणे यांनी परिश्रम घेतले






















