Thursday, April 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मी दादांबरोबर नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे – छगन भुजबळ

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
in maharashtra
0
मी दादांबरोबर नाही, मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे – छगन भुजबळ
0
SHARES
131
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाराजीच्या चर्चेनंतर छगन भुजबळ यांनी एबीपी माझासोबत बोलताना या सर्व अफवा असल्याचं स्पष्टीकरण दिलं. विधानसभेआधी अथवा नंतर मी कुठेही जाणार नाही. मी दादांबरोबर नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे. कायमच राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहिल, असे छगन भुजबळ म्हणाले. मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यात संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर चर्चेला आणखी जोर आला होता. याबाबत एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलं. प्रसारमाध्यमांकडे सध्या दाखवण्यासाठी काही नसल्यामुळे भुजबळांच्या बातम्या दाखवल्या जात आहेत, असेही भुजबळ म्हणाले.

मी नाराज नाही, कुणालाही भेटलो नाही –
मी अतिशय नाराज नाही. मी कोणत्याही नेत्याला भेटलो नाही. माझ्या नाराजीच्या चर्चा फक्त प्रसारमाध्यमांनीच सुरु केल्या. मी नाराज असल्याच्या चर्चा साफ खोट्या आहेत. मी नाराज नाही, मी कुणालाही भेटलो नाही. आमच्या विरोधीपक्षातील नेत्याला भेटलेलो नाही. त्यांना कधी भेटणार… मला वेळच नाही, असे छगन भुजबळ म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.

नाराजीच्या चर्चेनंतर भुजबळांनी सगळा कार्यक्रमच सांगितला.

10 तारखेला षणमुखानंद हॉल येथे कार्यक्रमात होतो.

11 तारखेला आमच्या लोकांसोबत होतो.

12 तारखेला अजित पवारांच्या घरी बैठकीला होतो.

13 तारखेला राज्यसभेचा अर्ज भरण्यासाठी गेलो.

14 तारखेला पुण्यात होतो.

15 तारखेला मी येवल्यात होतो.

16 तारखेला मी मुंबईत होतो.

मला कुणाला भेटायचं असेल तर मी उघडपणे भेटेल, असे भुजबळ म्हणाले. चॅनलला जोपर्यंत नवीन काही भेटत नाही, तोपर्यंत भुजबळ भुजबळ चालेल.

राजकारणात नाराज होऊन चालत नाही –
मी नाराज नाही. राजकारणात नाराज होऊन चालत नाही. राजकारणात प्रत्येकजण नाराज होतो अन् दुसऱ्या दिवशी कामला लागतो. कमी जागा मिळाल्यामुळे राहुल गांधी नाराज असतील, मोदीसाहेबही नाराज असतील. शरद पवारही नाराज असतील.. देवेंद्र फडणवीसही नाराज असतील.. अजित पवारही बारामतीची जागा का गेली, त्यामुळे नाराज असतील. ज्याप्रमाणे नाराजीनंतर सर्व नेते कामाला लागले, तसेच मीही कामला लागलोय. मी नाराज नाही. किंवा कुणालाही भेटलो नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

समता परिषदेची बैठकीत काय झालं ?
समता परिषदेची बैठक अद्याप झालेली नाही. पुढील पाच सहा दिवसात होईल. काही लोक मला भेटायला आले होते. बीड, बारामती जागा का गेली, अडचणी का आल्या..विदर्भात जागा का कमी आल्या. राज्यसभेला उभं का नाही राहिलात, याबाबत चर्चा झाली. मला भेटायला आलेले लोक त्या त्या भागात काम करतात. तेथील माहिती मला हवी होती. लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला. त्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीची चर्चा झाली नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

Post Views: 30
Previous Post

मोठी बातमी : महाराष्ट्रात कोणा एकट्याच्या मर्जीने पक्ष चालणार नाही – दिल्लीतील नेत्यांच्या सूचना

Next Post

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

ताज्या बातम्या

अनेक वर्षांपासून एस.टी बस सेवेअभावी शिक्षणासाठी मोठ्या अडचणींचा सामना

April 23, 2026

मंठा तालुक्यात वाळू माफियांचा उच्छाद

April 23, 2026

तामिळनाडूच्या व्यापाऱ्यावर गुन्हा; १४ लाखांची फसवणूक

April 23, 2026

आयुक्तांचा दणका २८ हजार ५०० रुपयांचा दंड

April 23, 2026

हॉर्न वाजिवण्याच्या कारणावरून पाच जणांनी केली मारहाण

April 23, 2026

स्त्रीभ्रूणहत्या व अवैध्य गर्भपाताच्या प्रकरणांना आळा बसणार

April 23, 2026

पैशांच्या कारणावरून सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार

April 23, 2026

सात रस्ता येथे दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला

April 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0825606

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697