बारामती – पावसाळ्याचे दिवसात वीज तारा तुटणे, वीज खांब उन्मळून पडणे, रोहित्र कोसळणे अशा घटना घडतात. तेंव्हा नागरिकांनी वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतर राखावे तसेच वीज यंत्रणेला स्पर्श करणे टाळावे. धोकादायक वीजयंत्रणेची सुचना तत्काळ महावितरणच्या कार्यालयास द्यावी. आपातकालीन स्थितीत मंडळस्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे महावितरणचे आवाहन आहे.
मंडळस्तरीय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक सोलापूर मंडळ 9029140455, सातारा मंडळ 9029168554 तर बारामती मंडळ 7875768074 हे आहेत. नागरिक व वीजग्राहक आपातकालीन स्थितीत या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देऊ शकतात. संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन स्थानिक विभाग, उपविभाग स्तरावर समन्वयासाठी नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवण्यात आले आहेत.
शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांना महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सुविधा केंद्राचे 1912 वा 19120 वा 1800-212-3435 वा 1800-233-3435 या 24 तास सेवेत असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध आहे. वीजपुरवठा खंडितची तक्रार 022-50897100 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन नोंदविण्याची सोय आहे.




















