
सांगोला – संस्थाध्यक्ष बाबुराव गायकवाड, उपाध्यक्ष महादेव गायकवाड, सचिव अंकुश गायकवाड व प्राचार्य डॉ.रणजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज मधील अल्युमनी असोसिएशन (माजी विद्यार्थी संघटना) मार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये सामाजिक बांधिलकी जपत कै.काकासाहेब साळुंखे पाटील विद्यालय हंगिरगे, कै.रावसाहेब पाटील आदर्श विद्यालय कडलास, श्री सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नागज, न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु.कॉलेज पाचेगाव (बुद्रुक), विकास विद्यालय व ज्यु.कॉलेज अजनाळे, क्रांतिवीर विनायक दामोदर सावरकर विद्यालय चिनके, बलवडी हायस्कूल बलवडी, श्री संत तुकाराम विद्यालय बोंडले, यशवंतराव चव्हाण विद्यालय फळवणी, जनता विद्यालय व ज्यु.कॉलेज मळोली, विद्यामंदिर हायस्कूल लक्ष्मी दहिवडी, स्वामी विवेकानंद विद्यालय गुंजेगाव, श्री वेताळ विद्यामंदिर शिरशी या विविध तालुक्यातील प्रशालेसाठी व्हाईट बोर्ड, डस्टर व पेन या शालेय उपयोगी वस्तूंची भेट देण्यात आली. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गणेश मिसाळ, उपाध्यक्ष निलेश माने, सचिव आनंद गायकवाड, सहसचिव पृथ्वीराज लिगाडे, खजिनदार शरद गायकवाड, सदस्य विशाल गाडवे, धनाजी काकडे तसेच प्रशालेचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून भविष्यातही असे उपक्रम राबविण्याचा निर्धार संघटनेकडून करण्यात आला आहे.
Post Views: 11