Wednesday, August 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

४८ तासांत अंगणवाडी पोषण आहाराचा पंचनामा; निकृष्ट आहाराच्या तक्रारींनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

तरुण भारतbyतरुण भारत
August 26, 2026
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – अंगणवाडी केंद्रांमधून गर्भवती महिला, स्तनदा माता आणि चिमुकल्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेवरून राज्यभर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यानंतर महिला व बालविकास विभागाने अखेर कठोर भूमिका घेतली आहे. निकृष्ट आहाराच्या तक्रारींची गंभीर दखल घेत राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमधील पोषण आहाराची ४८ तासांत प्रत्यक्ष तपासणी करण्याचे आदेश एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे केवळ कागदोपत्री नोंदी न तपासता प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या ताटात जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेची पडताळणी होणार आहे.

आयुक्तांनी २२ ऑगस्ट रोजी सुटीच्या दिवशीही आदेश काढून नागरी, ग्रामीण आणि आदिवासी भागातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेट देण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य सेविका आणि पर्यवेक्षिकांनाही तपासणी प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात येणार आहे. आहाराचा दर्जा समाधानकारक नसल्याचे आढळल्यास संबंधित पुरवठादाराकडून तो तातडीने बदलून घेण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनीही काही अंगणवाड्यांना अचानक भेटी देऊन फेरतपासणी करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. तपासणीनंतरही आहाराच्या गुणवत्तेबाबत तक्रारी आढळल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तपासणीचा सविस्तर अहवाल मंगळवारी सायंकाळी सहापर्यंत आयुक्तालयाला सादर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे.
चौकट
तक्रारींचा पाढा वर्षानुवर्षांचा
अंगणवाड्यांमधील पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत गेल्या सहा-सात वर्षांपासून तक्रारी होत असल्याचा दावा महाराष्ट्र अंगणवाडी कृती समितीने केला आहे. तांदूळ, डाळ, खिचडी, शिरा, वाटाणा आणि भरडा यांचा दर्जा निकृष्ट असल्याच्या तक्रारी वारंवार पुढे आल्या आहेत. खिचडीला दुर्गंधी येणे, शिरा बेचव असणे, तसेच वाटाणा अनेक शिट्ट्या होऊनही न शिजणे, अशा तक्रारींमुळे योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.
कोट
सोलापूर जिल्ह्यात प्रत्यक्ष तपासणी सुरू
आयुक्तांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराची प्रत्यक्ष तपासणी सुरू करण्यात आली आहे. आहाराचा दर्जा, साठवणूक, वितरण व्यवस्था तसेच लाभार्थ्यांना प्रत्यक्ष मिळणाऱ्या आहाराची गुणवत्ता तपासण्यात येत आहे. निकृष्ट आहार आढळल्यास संबंधित पुरवठादाराकडून तो बदलून घेण्याबरोबरच वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी दिली.
कोट
‘फक्त पाहणी नको, प्रयोगशाळेतील अहवालही हवा’
“निकृष्ट पोषण आहाराचा प्रश्न आजचा नाही. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही याबाबत आवाज उठवत आहोत. ४८ तासांत तपासणीचे आदेश देणे ही चांगली बाब आहे; मात्र तपासणी कागदावर न होता प्रत्यक्ष लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराची झाली पाहिजे. आहाराचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून त्याचे अहवाल सार्वजनिक करावेत. दोषी पुरवठादारांवर कठोर कारवाई झाली तरच या तपासणीला अर्थ राहील,” अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघाचे सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड यांनी केली.
चौकट
आता कसोटी प्रशासनाची
अंगणवाडी पोषण आहार हा केवळ एका योजनेचा भाग नसून बालकांच्या आणि मातांच्या पोषणाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे ४८ तासांच्या तपासणीत नेमक्या किती अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट आहार आढळतो, नमुने प्रयोगशाळेत पाठविले जातात का आणि दोषी पुरवठादारांवर प्रत्यक्ष कारवाई होते का, याकडे आता लक्ष लागले आहे. तपासणीचा अहवाल कागदावरच राहणार की त्यातून पोषण आहाराच्या गुणवत्तेत कायमस्वरूपी सुधारणा होणार, हेच या कारवाईचे खरे फलित ठरणार आहे.
Post Views: 7
Previous Post

गजराज गणेश मिञ मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन मदने तर उपाध्यक्षपदी महेश लोखंडे

Next Post

रेशन तांदूळ अपहार प्रकरणात आरोपींचा जामीन मंजूर 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

रेशन तांदूळ अपहार प्रकरणात आरोपींचा जामीन मंजूर 

ताज्या बातम्या

जीवनसाथी डॉट कॉमवरुन ओळख करुन संबंध ठेवून दोघांचे प्रायव्हेट फोटो वीडियो सोशल मीडियावर अपलोड केले प्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर

August 26, 2026

रेशन तांदूळ अपहार प्रकरणात आरोपींचा जामीन मंजूर 

August 26, 2026

४८ तासांत अंगणवाडी पोषण आहाराचा पंचनामा; निकृष्ट आहाराच्या तक्रारींनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

August 26, 2026
गजराज गणेश मिञ मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन मदने तर उपाध्यक्षपदी महेश लोखंडे

गजराज गणेश मिञ मंडळाच्या अध्यक्षपदी सचिन मदने तर उपाध्यक्षपदी महेश लोखंडे

August 26, 2026
निरा उजवा कॅनाॅलवरील ब्रिटीशकालीन एस्केप तब्बल 16 वर्षांनंतर उघडला चार गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा

निरा उजवा कॅनाॅलवरील ब्रिटीशकालीन एस्केप तब्बल 16 वर्षांनंतर उघडला चार गावातील शेतकऱ्यांना पाण्याचा फायदा

August 26, 2026

दोन्नतीच्या फाईलला लालफितीचा फास

August 26, 2026
५ वी जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंचे यश

५ वी जिल्हास्तरीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंचे यश

August 26, 2026

गाईंना निर्दयतेने डांबून ठेवले; तिघांवर गुन्हा

August 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1119364

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!