बार्शी – सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनियर खेळाडूंची सोलापूर जिल्हा वुशू असोसिएशनच्यामार्फत दि.२३ ऑगस्ट रोजी श्री.सुशिलकुमार शिंदे ऑफ फिजिकल एज्युकेशन, नेहरुनगर, सोलापूर या ठिकाणी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत बार्शीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी स्थान निश्चित केले आहे…
सदरील स्पर्धेत सिनियर वजन गट- ४८ किलो गटात – कु.संचिती जाधव हिने रोप्य पदक मिळविले, ज्युनिअर गटात ६० किलो वजन गटमध्ये कु.समीक्षा राऊत हिने सुवर्ण पदक मिळविले. मुलांमध्ये सिनियर ८० किलो वजन गटांमध्ये यशराज रोडे याने सुवर्ण पदक मिळविले व सब ज्युनिअर ४८ किलो वजन गटांमध्ये कु.अवनी धुमाळ हिने सुवर्ण पदक मिळविले.
सदरील विद्यार्थ्यांना ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स क्लब बार्शीचे अध्यक्ष भगवान जाधव सर , वुशू संघटनेचे प्रमुख फुलचंद जावळे, उपाध्यक्ष गणेश रोडे, सचिव सौ.सविता जाधव, कु.तेजमाला खबाले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
त्यांच्या या यशाबद्दल सचिन राऊत, सौ.स्नेहल रोडे, रितेश जानराव, अतुल जाधव, विश्वजीत जाधव, पृथ्वीराज रोडे, सौ. हर्षदा धुमाळ व सर्व पालकांनी प्रशिक्षकांनी या खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन केले आहे.