बार्शी – शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने धस पिंपळगाव रस्त्यावरील सौदागर वीटभट्टी परिसरात कारवाई करत, दोन गाईंना विनाचारा-पाणी निर्दयतेने डांबून ठेवल्याप्रकरणी तीनजणांविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार अजीज मणसुब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुन्हे अन्वेषण पथक पोलीस ठाण्यात कार्यरत असताना पोलीस निरीक्षक गणेश कुंभार यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली होती.
धस पिंपळगाव रोडवरील सौदागर वीटभट्टी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये जनावरे कोंडून ठेवली असल्याचे समजताच पोलीस पथकाने तातडीने तेथे जाऊन छापा टाकला. शेडची पाहणी केली असता, त्या ठिकाणी दोन जर्शी गाई अत्यंत दाटीवाटीने बांधून ठेवलेल्या आढळून आल्या. या दोन्ही गाईंसाठी चारा किंवा पाण्याची कोणतीही सोय केलेली नव्हती. या प्रकरणी तयब वारिस सौदागर, मोबीन वारिस सौदागर आणि मुनाफ वारिस सौदागर (सर्व रा. मंगळवार पेठ, बार्शी) यांनी आणल्याचे निष्पन्न झाले. गाईंची काळजी न घेता त्यांना क्रूरपणे कोंडून ठेवल्यामुळे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Post Views: 5