पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील गजराज गणेश मिञ मंडळाच्या नुतन पदाधिकारी निवडीसाठी मंडळाचे संस्थापक सचिनदादा पडळकर व चंद्रशेखर तरंगे यांच्या अध्यक्षतेखाली नूतन 2026 साठी पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती .या बैठकीमध्ये अध्यक्षपदी सचिनदादा मदने तर उपाध्यक्षपदी महेश लोखंडे व सहीद खाटीक ,खजिनदारपदी साहील मुलाणी व सुरज चोरमले ,तर मिरवणुक प्रमुख पदी उमेशभाऊ सरवदे व गणेश घुले व संघर्ष पुकळे ,रामभाऊ गलांडे, सचिन भैस, सुमीत मोरे व उमेश पडळकर तर सचिवपदी सुरज सातपुते, सहसचिव पदी शाहरुख मुलाणी व अनिकेत लोंखंडे, कार्याध्यक्षपदी काजम तांबोळी, दया सुळे, विशाल सुळे यांच्या सर्वानुमते बिनविरोध निवडी करण्यात आल्या.यावेळेस सचिनदादा पडळकर, शिवराज पुकळे व चंद्रशेखर तरंगे यांनी मार्गदर्शन केले.सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचा सचिन पडळकर, शिवराज पूकळे, चंद्रशेखर तरंगे,उमेशभाऊ सरवदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी या गणेशोत्सवाच्या माध्यमातून, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांना चालना देऊन हा गणेशोत्सव विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचा मानस व्यक्त केला. फोटो _ गजराज गणेश मिञ मंडळाचे नुतन पदाधिकारी समवेत सचिन पडळकर, शिवराज पुकळे ,चंद्रशेखर तरंगे, उमेशभाऊ सरवदे व इतर मान्यवर.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

















